Address: | Raigad, Maharashtra |
प्रती, महावितरण कार्यकारी अभियंता,
नेरळ, तालुका- कर्जत.
रायगड.
विषय:- वीज प्रवाहीकेमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्या बाबत.
महोदय,
आम्ही समृद्धी सहकारी गृहनिर्माण संस्था, ए १ ते ए ३, गाव गारपोली, तालुका : कर्जत च्या वतीने दिनांक २७/०१/२०१५ रोजी (तीन पैकी दोन फेस बंद असून रिटन करंट येतोय) काही तांत्रिक बिघाड असल्या बद्दल तक्रार दिली होती, त्या प्रमाणे त्या विभागातील वायरमेन येउन चेक केले असता त्यांना मेन केबल मध्ये काही तरी मोठा बिघाड असल्याचे आढळून आले आहे.
परंतु दुसऱ्या दिवशी परत चेक केले असता, सर्व काही ठीक आहे असे सांगण्यात आले; त्यामुळे शंका निर्माण झाली आहे, कारण येथे खूप मोठी लोकवस्ती असून लहान मुले, वृद्ध व स्त्रिया यांचा विचार करता पुढील कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी योग्य ती उपाय योजना करावी हि विनंती.
आपले कृपाभिलाषी
SAMRUDDHI CO-OP. HSG. SOC. LTD. (A1-A3) Was this information helpful? |
Post your Comment