[Resolved]  Vodafone.in — वोडाफोन या कंपनी कडून होत असलेली पिळवणूक

Address:Mumbai City, Maharashtra

मी "दीपिका रमाकांत म्हात्रे " वोडाफोन या कंपनी कडून मी पोस्टपेड चे नवीन सीम [protected] एप्रिल महिन्यात खरेदी केले व त्याचा बिलिंग काळ हा प्रत्येक महिन्याचा 18 ते दुसऱ्या महिन्याच्या 1 7 तारखे पर्यंत देण्यात आला. या पोस्टपेड कनेक्शन मध्ये 399 रुपयांचे रेंटल प्लान होते. या स्कीम मध्ये मला 1 GB इंटरनेट पहिल्या 3 महिन्यांसाठी फ्री देण्यात आले. पहिले 3 महिन्यांचे बिल हे मला 400 ते 450 रुपयांच्या घरात आले व ते मी रीतसर भरलेही. परंतु नंतरचे बिल हे मला 5000 रुपयांच्या वर पाठवण्यात आले. तेव्हा मला धक्काच बसला. मी त्यांना बिलाचा तपशील जाणून घेण्यासाठी call केला असता त्यांनी मला तुम्ही इंटरनेट सुविधा जास्त वापरली म्हणून तुम्हाला हे बिल पाठवण्यात आले आहे असं सांगितले, परंतु मला जी 1 GB इंटरनेट सुविधा फ्री देण्यात आली होती ती संपल्या नंतर वोडाफोन या कंपनी कडून मला कोणतीही पूर्व सूचना किंवा call करण्यात आला नाही आणि त्यांनी त्यांची हि चूक मान्य हि केली कि आम्ही तुम्हाला कोणताही call किंवा मेसेज केला नाही, परंतु तुम्हाला हे बिल भारावेच लागेल अशी भाषा त्यांच्या कडून करण्यात आली. तेव्हा मी त्यांना सरळ शब्दात सांगितले कि माझी जर चूक नाही तर एव्हडे मोठे बिल मी का भरावे. त्या नंतर त्यांनी माझे इंटरनेट आणि outgoing call बंद केले. तेव्हाही त्यांना परत call करून मी विचारणा केली असता त्यांनी मला तुम्ही बिल न भरल्या मुळे तुमच्या सर्व सुविधा बंद करण्यात आल्या आहेत हे सांगून मला त्रास देणे सुरु केले. मी पुन्हा त्यांना तेच सांगितले की मी बिल भरण्यास तयार आहे परंतु मला तुम्ही 400 ते 500 रुपयांच्या घरात बिल पाठून द्या. परंतु त्यांनी माझे काही एक ऎकुन घेतले नाही व मला call करून त्रास देणे चालूच ठेवले. त्यांच्या कडून मला वारंवार call करून त्रास देण्यात आला व शेवटी माझ्या घरी माणसं पाठवून मला बेइज्जत करण्यात आले. त्यांनाही मी तेच सांगितले कि मी बिल भरणार नाही. हव असेल तर माझ connection deactivate करून टाका. व आता notice पाठून मला एक प्रकारे bill भरण्यासाठी धमकावण्यात आले आहे. तरी कुपया आपण या संपूर्ण प्रकारची योग्य ती दखल घेऊन आणि वोडाफोन या कंपनीवर रीतसर कारवाई करून मला न्याय मिळून द्यावा. हि नम्र विनंती, दीपिका रमाकांत म्हात्रे मी भरलेली त्यांची बिल मी त्यांच्या मेसेज सकट येथे देत आहे. 1 ) Hello! Your Vodafone mobile bill for Rs.184.83 is due on 06/05/2013.Please pay by the due date to avoid late payment fees. Please ignore if paid. 2 ) Hello! Your Vodafone mobile bill for Rs.341.63 is due on 05/06/2013.Please pay by the due date to avoid late payment fees. Please ignore if paid. 3 ) Your Bill of Rs 399.45 due on 06-Jul-13 has been generated. For details SMS MBILL to 111 tollfree, to view visit vodafone.in & to pay call 53333
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Aug 14, 2020
Complaint marked as Resolved 
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Vodafone India
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    36%
    Complaints
    27107
    Pending
    0
    Resolved
    9560
    Vodafone India Phone
    +91 22 7171 5000 (HQ)
    Vodafone India Address
    Peninsula Corporate Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai, Maharashtra, India - 400013
    View all Vodafone India contact information