S. T Mahamandal — Complaint

Address:400614

महोदय,
आज रेवस - कोकणभवन हि गाडी २० मिनिटे उशिराने पोयनाड बस स्टोप ला आल्याने खूप गर्दीने प्रवाशी चढले परंतु ड्रायव्हर च्या चांगल्या ड्रायव्हिंग मुळे गाडीने लवकरच वडखळ गाठले.
परंतु वडखळ येथे उभ्या असलेल्या तिकिट चेकर च्या बेजाबदार पणा मुळे गाडी ४५ मिनिटे तेथेच थांबून राहिली. त्या तिकीट चेकर चे नाव विचारले असता त्याने नाव सांगण्यास नकार देवून उलट प्रवाशांना पोलीस चौकी ची धमकी देवू लागला . सगळे प्रवाशी गाडीतून खाली उतरले. व प्रत्येक जन त्यांच्या कडे गयावया करू लागला कि आम्हाला दुसरी गाडीत तरी बसवून द्या नाहीतर हि बस तरी सोडा.
प्रत्यक्ष पाहता एका विद्यार्थीनि कडे तिकीट न मिळाल्याने त्यांनी कंडक्टर व विद्यार्थिनी या दोघानाही थांबवून घेतले. त्या मुलीला परीक्षेस जाण्यास उशीर होत होता तर त्या कंडक्टर कडे तिकीटाचा पुरावा मिळत नव्हता. तिकीट चेकर विद्यार्थिनी कडून उपरोक्त दंड न घेता तिचाही वेळ घेवून तिला कोर्या कागदावर कंडक्टर विषयी जवाब लिहण्यास सांगितले. या सर्व प्रकरणात इतर प्रवाशांपैकी एकाला चक्कर आली. काहीना प्रेतयात्रेला जाण्यास उशीर झाला तर आमच्या सारख्या दररोज प्रवास करणार्यांना नोकरीस दीड तास उशीर झाला. आणि नोकरीतून मेमो मिळाला.

तिकीट चेकर म्हणजे श्री हरीश पालकर यांनी जशी तिकिटे चेक करून योग्य ती शिक्षा देण्याची जबाबदारी घेतली तशीच उद्धत पणे न बोलता इतर प्रवाशांना पोलीस स्टेशन ची धमकी न देता त्यांचा वेळ न दडवता दुसर्या गाडीची सोय करून दिली असती. तर आज आमच्या वर हि वेळ आली नसती.

मी हरीश पालकर यांच्या बाबत तक्रार करत आहे. तातडीने योग्य ते शासन व्हावे.

- आर्कीटेक्ट विभावरी जुईकर
+2 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Navimumbai
    India
    File a Complaint