Badlapur Municipal Corporation — .

Address:Shivganga Building No -3, Yadav Nagar Aptewadi. Badlapur, Thane, Maharashtra, 421503

महोदय,
मागील १५ दिवसान पासून यादवनगर, बदलापूर परिसरातील कचरा गोळा करणारी घंटा गाडी न आल्या मुळे सर्व बिल्डिंगचे कचऱ्याचे डबे भरून वाहू लागले आहेत. सर्व बिल्डिंग आवारात घाणीचे साम्राज्य झाले आहे. तसेच या साठलेल्या काचऱ्या मुळे खूप घाण वास येत आहे तसेच किडे, माशा, मच्छर यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. घंटा गाडी बाबत संबंधित नगरसेवकां कडे विचारणा केली असता, गाडी नादुरुस्त झाल्याचे समजले, हे एक/दोन दिवस साठी ठीक आहे, जास्त दिवस लागणार असतील तर मग पर्यायी कचरा उचलण्याची व्यवस्था करणे हे नगर सेवकांचे काम नाही का? अशा प्रकारे नागरिकांना वेठीस धरणे हे बरोबर नाही, "स्वच्छ भारत अभियान" हे फक्त बॅनर वर लिहिण्या पुरतेच राहिले आहे अशी अवस्था झाली आहे. नगर पालिका टॅक्स घेताना कचरा नेण्याचे देखील पैसे घेते. मग नागरिकांनी असेच घाणीत राहायचे असेल तर टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना लुबाडल्या सारखे होईल.
आपणास कळकळीची विनंती आहे, कि लवकरात लवकर या समस्ये पासून यादवकारांची सुटका करावी, हि विनंती.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Shivganga Building No -3, Yadav Nagar Aptewadi. Badlapur, Ambarnath
    Maharashtra
    India
    File a Complaint