[Resolved] Central Bank Of India — Manejar sin nature

 
2 Reviews
Rahta, Maharashtra, India
 arunraje
मा.मोहदय साहेब
सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया
मुंबई-४०००२१

विषय- loan हप्त्यासाठी कालावधी मिळण्याबाबत व बँकेच्या शाखेच्या शाखा अधिकार्याकडून होणार्या वागणुकी बाबत

अर्जदार-अरुण शिवाजीराव फोपसे पाटील
मु.पो.कोल्हार बु ता-राहता जि-अहमदनगर पिन-४१३७१०
मो-९६५७६३२३०३
मोहदय.
मी कारणे विनंती अर्ज करतो कि, माझे कोल्हार येथील सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत सेविंग तसेच करंट खाते आहे.मी आपल्या बँकेतून श्री.साई इन्फोटेक कॉम्पुटर सेंटर चा व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेतले आहे.माझ्या करंट खात्याचा खाते क्रमांक ३४१६२६३३९९ असा आहे.परंतु माझ्याकडे स्वताची कुठलीही संपती बँकेला गहाण देण्यासाठी नसल्याने मी ओ.बी.सी.महा- मंडळ यांच्या मार्फत आपल्या शाखेतून कर्ज घेतले आहे.परंतु ह्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे माझा व्यवसाय चांगल्या प्रकारे होवू शकला नाही त्या कारणाने मी आपल्या शाखेतून घेतलेल्या कर्जाची परत फेड वेळी च्या वेळी करू शकलो नाही.परंतु जेवढे पैसे व्यवसायातून मला मिळाले ते सर्व मी माझ्या कर्ज खात्यात भरून कर्ज भरले. मी स्वतःह अत्यंत हालाकी मध्ये हे संपूर्ण वर्ष पार केले परंतु आता मार्च २०१७मध्ये आमच्या व्यवसायाचे जे सिजन असते त्यासाठी सेंटर रिनीवल ला लागणारा पैसे आमच्याकडे नाही. त्याकारणाने माझे कर्ज खात्याचे तीन हप्ते थकलेले आहेत.परंतु मी माझ्याकडून होईल तेवढे मी भरण्याचा प्रयत्न करीत आहे.परंतु आपल्या शाखेतून मला मा.शाखा अधिकारी साहेब मा.श्री.मानकर साहेब यांच्याकडून मला वेळो-वेळी अपशब्द व अपमानास्पद वागणूक मिळते व माझ्या व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी अडवले जाते.मला मुलांच्या फीज mkcl board ला नेहमी पाठव्या लागतात परंतु ते मला व्यवहार करण्यास अडवणूक करतात.त्यामुळे माझा व्यवसाय वाढण्यासाठी मी आपल्या शाखेतून कर्ज घेतले होते.परंतु मा.शाखाधिकारी साहेब व्यवसाय वाढण्यासाठी समजून न घेता व्यवसाय बंद व्हावा असे त्यांचे प्रयत्न आहेत.मी कर्ज घेवून व्यवसाय चालू केला कारण माझ्या सर्व कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे.परंतु दुष्काळामुळे मी व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकलो नाही.परंतू याचा अर्थ असा नाही कि मी लगेच कर्ज फेडण्याची माझी आयपत नाही.परंतु आपले शाखा अधिकारी साहेब आम्हाला व्यवसाय पण करून देत नाहीत आणि बोर्ड ला पाठवण्याची रक्कमला होल्ड करतात त्यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होवून माझ्या सेंटर चि नावाची बद्द्नामी होते. त्यामुळे माझा व्यवसाय पूर्ण थांबला जातो व त्यापासून मला मिळणारा नफा देखील बुडतो.त्याकारणाने मी व्यवसायमध्ये प्रगती करू शकत नाही.त्याचप्रमाणे सर्व लोकांमध्ये माझा अपमान करतात व शिवीगाळ करतात व्यवसायाच्या ठिकाणी येवून कस्टमर समोर घाणेरड्या भाषेत बोलतात त्यामुळे माझ्या व्यवसायावर परिणाम होतो व माझ्याकडे जे विद्यार्थी शिकण्यासाठी येतात त्यांच्या समोर माझा अपमान होवून माझे अब्रू व आर्थिक नुकसान होते.त्याचप्रमाणे मी सवलतीची विनंती केली असता तुला काय करायाचे आहे ते कर माझ्या विषयी तक्रार कर माझे वर पर्यंत सबंद आहे.सर्व मोठ्या हुद्यावर माझे पाहुणे आहेत माझे कुणीच काही करू शकत नाही अश्या एकदम गुंड भाषेत बोलून धमकी देतात तुझा व्यवसाय बंद करेल असे बोलतात.मी कर्ज हे व्यवसाय करून स्वताच्या पायावर उभा राहण्यासाठी घेतले आहे.परंतु तुमच्या शाखेच्या अधिकार्याच्या वागण्यामुळे माझे व्यवसायात मन लागत नाही त्याच प्रमाणे घरी माझ्या आईला रक्त दाबाचा आजार आहे.त्यामुळे सध्या मानसिक परिस्थिती बिघडलेली आहे.नेहमी होणार्या शाखा अधिकारी साहेबांच्या मानसिक तणावामुळे माझे जीवन मला नकोसे झाले आहे.तरी सदर अर्जाचा सहानुभूती पूर्वक विचार करावा हीच माझी कळकळीची विनंती आहे. आणि शाखाधिकारी सारख्या महत्वाच्या पदावर असे गुंड प्रवृतीचे लोकांवर योग्य कारवाई करावी माझा व्यवसाय पुन्हा सुरळीत चालू झाल्यास मी आपल्या घेतलेल्या कर्जाची परत फेड सुरळीत पणे करेल.परंतु शाखा अधिकारी साहेब यांच्यावर योग्य कारवाई करून मला कर्ज फेडी साठी काही कालावधीची मुदतद्यावी व माझे खाते थकीत होण्यापासून वाचवावे.व माझे जीवन संपवण्या पासून मला वाचवावे हि आमची शेवटची विनंती.
सदर हि अर्ज प्रत मी मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदि साहेब,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व स्थानिक जिल्हा अधिकारी साहेब यांकडे पाठवली आहे. व आपल्या ऑफिस च्या पत्यावर देखील एक अर्ज प्रत पाठवली आहे.तरी मला ह्या अर्ज प्रत चे लवकर उत्तर मिळावे हि नम्र विनंती

आपला विश्वासू
अरुण शिवाजी फोपसे पाटील
९६५७६३२३०३
Complaint marked as Resolved Dec 26, 2016
mob-9657632303
email [email protected]

Complaint Status


[Dec 06, 2016] Central Bank Of India customer support has been notified about the posted complaint.
Complaint comments  1 Comment     Updated: Share0Tweet0

Comments

Sir i m account holder of your bank, and my account is in central bank ajeetgarh branch ., sir my check is not clearing from 15 days., and bank employees says next time check not submit in this branch, and ajitgarh is my nearest branch .

Post your Comment

  I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
  Your Rating (1 star is bad, 5 stars is good)
  code
  Customer satisfaction rating
  4%
  Complaints
  980
  Pending
  0
  Resolved
  36
  phone
  +91 22 6638 7777
  location
  Chander Mukhi, Nariman Point, Mumbai, Maharashtra, India - 400021
  Central Bank Of India - Manejar sin nature