Address: | Mumbai City, Maharashtra | Website: | cidco.maharashtra.gov.in |
मी आणि सोसाटीचे इतर सदस्य, एप्रिल २०१८ पासून 'भूखंड क्रं . बी - ६१ /१, सेक्टर क्रं २३, सिवूड दारावे, नेरुळ ', भूखंड हस्तांतरणासाठी अर्ज देऊन सिडको भवन, बेलापूर, वसाहत विभाग २ मध्ये (पहिला मजला ) येथे सारख्या फेऱ्या मारून फार हताश झालो आहोत . सिडको च्या कामकाजा वरचा विश्वासच उडून गेला आहे. काही न काही कारणे सांगून सिडको स्टाफ कामात दुर्लक्ष करत आहे.
मी आपल्याला कळवू इच्छितो कि भूखंड हस्तांतरणा साठी माझ्या नोकरीची भरपूर रजा झाली व मला मानसिक व शारिरीक त्रास होत आहे तरी आपण कृपया करून या भूखंड हस्तांतरण कामासाठी मला मदत करावी व माझ्या या तक्रारी वर योग्य ती कार्यवाही करावी हि विनंती .
Was this information helpful? |
Post your Comment