Maharashtra State Road Transport Corporation [Msrtc] — inconvenience for women | |||
महोदय, मी आज दिनांक 30-12-17 ला जळगाव जामोद-नागपूर बसने प्रवास करीत होते बस नंबर MH14 BT 4306. मी हिवरखेड वरून नागपूरला जाण्यासाठी सकाळी 11.30ला बसमध्ये बसले माझ्या सोबत माझी दोन मुलं वय 15 व वय 5 होती.अमरावतीला बस दुपारी तीन वाजता पोहोचली येथे बस थांबते म्हणून मी माझी पाळी आलेली असल्याने पॅड बदलवण्यासाठी मी टॉयलेटमध्ये गेले.तेथे जाऊन येण्यात मला जास्तीत जास्त 10ते12 मिनिट लागला असेल. माझा मोठा मुलगा ज्याचा उजवा हात तुटलेला आहे आणि हाताला प्लास्टर लागलेलं आहे तो बसमध्ये बसलेला होता छोटा पाच वर्षांचा मुलगा माझ्यासोबत होता पण मी परत येई पर्यंत ड्रायव्हरने माझ्या मोठ्या मुलाला सामान घेऊन खाली उतरवून दिले. मी परत आले तेव्हा माझा मुलगा घाबरून घामाने ओला होऊन अमरावती बस स्टॉप वर उभा होता.माझ्या मुलाने सांगून, विनवणी करूनसुद्धा ड्रायव्हरने बस थांबवली नाही . त्यानंतर मी तक्रार देण्यासाठी गेले तेथे त्यांनी त्याच टिकीटावर नागपूर पर्यंत प्रवासाची अनुमती दिली पण ह्या सर्वामध्ये एक तासाचा उशीर व माझ्या हात तुटलेल्या मुलाला व मला शारिरीक व मानसिक त्रास झाला . तरी माझ्या तक्रारीचा विचार करुन त्यावर योग्य कार्यवाही करण्यात यावी ही माझी आपल्याकडून अपेक्षा आहे.तरी माझ्या तक्रारींवर काय कार्यवाही झाली ते कृपया माझ्या e-mail वर पोहोच द्यावी माझा e mail address पुढील प्रमाणे आहे rajesh [protected]@g mail. com आहे. माझी आपल्यावरची विश्वासहर्ता कायम राहण्यासाठी कार्यवाहिच्या अपेक्षेत . आपली एक स्त्री प्रवाशी, सौ. सारिका राजेश पंत 3, अध्यापक ले आऊट दत्तवाडी, नागपूर 23. Was this information helpful? | |||
Add a Comment | |||
8%
Complaints
2423
Pending
0
Resolved
183
Post your Comment