Address: | Pune - Nashik Hwy, Santwadi, Maharashtra, Ahmednagar, Maharashtra, 422602 |
पुणे - नाशिक महामार्गावर हॉटेल फाउंटन अधिकृत बस थांबा येथे चहा नाश्ताचे प्रवासी कुपन न मिळणे बाबत.
पुणे - नाशिक महामार्गावर हॉटेल फाउंटन हा अधिकृत बस थांबा असून येथे दररोज अंदाजे 200 हुन अधिक बस येथे चहा नाश्ता साठी थांबतात.
येथे प्रवाश्यांच्या सोयीसाठी देण्यात येणारी चहा नाश्ता चा कुठलाही सूचना फलक उपलब्ध नाही तसे त्या बद्दल विचारले असता अशी कुठलेही सेवा आपल्याकडे देण्यात येत नाही असे सांगण्यात आले.
हॉटेल फाउंटन बद्दल असणारी
काही आक्षेप.
1)महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्रालयाच्या आदेशानुसार हॉटेलला 30 रुपयात नाश्ताचे कुपन देणे व त्या बाबत हॉटेलच्या बाहेर तसा सूचना फलक लावणे अनिवार्य आहे.तसा कुठलाही फलक अथवा सेवा प्रवाश्यांना
येथे उपलब्ध नाही.
2)तसेच हॉटेलच्या खाद्यपदार्थांच्या किंमती वाजवी दरा पेक्षा जास्त आहेत की ज्या सर्वसामान्याना परवडणाऱ्या नाहीत.
कृपया वरील तक्रारीस ग्राह्य धरून हॉटेल फाउंटनचा अधिकृत बस थांबा रद्द करावा अथवा प्रवासी नाश्ता चे कुपन उपलब्द्ध करून देण्यात यावे.
Was this information helpful? |
Post your Comment