Maharashtra State Road Transport Corporation [Msrtc] — time table

Address:Satara, Maharashtra, 412803
Website:MSRTC

विषय - वाई आगारातील बसेसच्या कोलमडलेल्या वेळापत्रकाबाबत.
महोदय,
मी वर नमुद अर्जदार सह्याद्रीनगर वाई येथे राहत असून गेले 4 वर्षे झाली आपले परिवहन विभागातील बसने वाई - सातारा असा दररोज प्रवास करीत आहे. तरी सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत कोणतीच ordinary (साधी) गाडी वेळेवर येत नाही. सदरबाबत विचारणा केली असता कायम आरेरावीची भाषा वापरुन उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. आपल्याला आवश्यक वाटलेस आपण वाई आगारात येवून गाड्यांचे वेळापत्रक पहावे. एकही कर्मचारी कधीही वेळेवर उपस्थित नसतो. कर्मचारी जेव्हा येणार तेव्हा गाडी सुटणार असा थाट येथील अधिकारी वर्गाचा असतो. दररोज होणार्या उशीरामुळे विद्यार्थी आणि कर्मचारी वर्गाचे आतोनात असे कधीही नाही भरून निघणारे असे नुकसान होत आहे. सदर नुकसानाला जबाबदार कोण?
तसेच काही काही वाहक मासिक पास धारकांसोबत आरेरावीची भाषा वापरुन बस मध्ये येण्यास मज्जाव करतात. त्याबाबत वरीष्ठ अधिकार्यांना विचारणा केली असता त्यांनी कधीही त्याबाबत कोणतीही कारवाई केली नाही.
तसेच वाई - सातारा विना थांबा सेवा दर 20 मि. गाडी आहे. सकाळी 7 ते 8.30 या वेळेत त्या गाड्या मोकळ्या जातात पण कधीच ordinary बसेस मोकळ्या जात नाहीत.
त्यामुळे सदर गैरहजर राहून कर्तव्यात कसूर करणार्या कामगारांची चौकशी करून सदर समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा. ही विनंती.
वाई
ता. 31/01/2018
माहितीसाठी प्रत रवाना -
1. मा. मुख्यमंत्रीसो महाराष्ट्र राज्य
2. मा. पंतप्रधान भारत सरकार
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC]
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    8%
    Complaints
    2423
    Pending
    0
    Resolved
    183
    Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC] Phone
    +91 20 2612 6218
    +91 20 2612 2591
    Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC] Address
    Pune Station, Pune, India - 411001
    View all Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC] contact information