Address: | Indrayaninagar bhosari, Bhosari, 411017 |
मा आयुक्त
पिंपरी चिंचवड म न पा
विषय पेन्शन व इतर रकमा मिळणे बाबत
अर्जदार श्री प्रभाकर रामचंद्र तावरे (से नि )सहा आरोग्य अधिकारी इ क्षेत्रिय
महोदय
सर आपले, सेवानिवृत्त कर्मचारी बाबत परिपत्रक वाचले. पण मी दि 31मे 2019 रोजी सेवानिवृत्त झालो आहे पण अद्यापही पेन्शन आणि देय रक्कम मिळाली नाही. प्रशासन, लेखा, आणि ई क्षेत्रिय यांचेकडे माझी फाईल फिरत आहे. वास्तविक माझी फाईल 30मे 2019 रोजी इ क्षेत्रिय विभागाने उशिरा पाठवली. आणि अजूनही फाईल चा प्रवास चालू आहे . या प्रकारे मला त्रास देण्याचा हेतू आहे माझे हक्का पासून मला वंचित ठेवले आहे.
मा सर्वोच न्यायालया ने सेवा निवृत्त कर्मचाऱ्याचे देय रकमा वेळेत देण्याचा निर्णय दि 14 ऑगस्ट 2014च्या एका केस मधे सखोल स्पष्टीकरण दिले आहे. इतक्या दिवस मला सर्वच फायद्या पासून वंचित ठेवले आहे.मा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पराभव होत असलेचे उदाहरण माझे बाबतीत घडले आहे.
सर माझे बाबतीत आपण त्वरित संबंधितांना सूचना द्याव्यात. हीं, कळकळीची विनंती
सही
प्रभाकर तावरें Was this information helpful? |
Post your Comment