Show menu
Close
FAQ FAQ Categories Categories Sign in Sign in
Close
ADVERTISEMENT

Pune Municipal Corporation — ,.

तारीख: १५.०३.२०१८
प्रती,
पुणे महानगरपालिका
माननीय अधिकारी
पुणे.

महोदय,

आमची रणजीत को.ओप.सोसायटी नावाने १२१४, एफ.सी.रोड पुणे येथे सहकारी ग्रुहरचना संस्थेत रजिस्टर सोसायटी आहे. सोसायटी अंदाजे ३५-४० वर्षे जुनी आहे. सोसायटीत एकुण २१ सभासद आहेत. सध्या फक्त २ सभासदांचे कुटुंब स्वत: राहतात, बाकी सर्वांनी आपापले फ्लॅट भाड्याने दिले आहेत. त्यामुळे मेन्टेनन्स पण वेळेवर जमा होत नाही. सोसायटीची ड्रेनेज लाईन, कंपाऊंड वगरे खुप मोडकळीस आलेले आहे. आम्ही सोसायटीच्या दुरुस्तीमध्ये बरेचदा खर्च केला आहे, त्यामुळे आता खर्च करत बसण्यापेक्षा आम्ही सोसायटीचे पुनर्वसन करणार आहोत.

सोसायटीमध्ये एकाने अनधिकृत खानावळ चालु केली आहे. तेथे जेवायला येणारे लोक सोसायटी आवारात थुंकतात, तसेच आवारात दारु पिऊन बाटल्या ईतरत्र फेकतात. सोसासटीत रहात असणार्या महीलांची येता जाता टिंगल करतात त्यामुळे सोसायटीतील महीलांमधे असुरक्षिततेचे वातावरण असते. सोसायटीमध्ये जुन्या बेवारशी दोन चाकी गाड्यादेखील तशाच पडुन आहेत, आम्ही ह्या बाबतीत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देउन सुध्दा पोलीसांनी काहीही कारवाई केलेली नाही.

सोसायटीला लागुन जो फुटपाथ आहे त्यावरदेखील ५-६ अनधिकृत स्टॉल चालु आहेत. हे सर्व लोक त्यांचा माल ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या गाड्या/सायकल ठेवण्यासाठी सोसायटीच्या आवाराचा विनापरवानगी वापर करत आहेत. सर्व खरकटे सोसायटीच्या ड्रेनेजलाईन मध्ये सोडुन देतात, त्यामुळे ड्रेनेजलाईन वारंवार ब्लॉक होते ते आम्हाला सर्व सभासदांकडुन पैसे गोळा करुन साफ् करावे लागते. खरकटे सगळीकडे पडलेले असते त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरुन डासांचा देखील त्रास होत आहे. त्यामुळे तेथील रहीवासी लोकांना डेंगु/मलेरीया सारख्या आजारांचा धोका संभवतो. सोसायटीच्या पाण्याच्या लाईनमधुनसुध्दा ह्यांनी अनधिकृत जोड घेउन पाण्याचा वापर सुरु केला आहे.

वारंवार ह्या लोकांना समज देउनसुध्दा हे लोक आम्हाला जुमानत नाहीत उलट येथील रहीवासी लोकांवरच दादागिरी करतात.

आम्हास आशा आहे कि आम्हाला ह्या त्रासामधुन मुक्त करण्यास फक्त आपणच मदत करु शकता. तरीही आम्हा सर्व सभासदांची आपणास कळकळीची विनंती आहे की आपण ह्या प्रकरणात लक्ष घालुन आम्हास मदत करावी.

तसदिबद्दल क्षमस्व.

आपला कृपाभिलाशी.

रणजीत को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.
सर्व सभासद
रूपकुमार कुंदनानी
सेक्रेटरी
[protected]
Was this information helpful?
Yes (0)
Mar 15, 2018

Complaint Status

Municipal Corporation of Pune customer support has been notified about the posted complaint.
Complaint comments  Add a CommentShareTweet

Post your Comment

  I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
  code
  Municipal Corporation of Pune
  Customer Care Service
  Customer satisfaction rating
  6%
  Complaints
  703
  Pending
  0
  Resolved
  41
  Municipal Corporation of Pune Phone
  +91 20 2550 1130
  +91 20 25501000
  Municipal Corporation of Pune Address
  PMC Building, Near Mangla Theatre, Pune, Maharashtra, India - 411005
  View Full Information
  ADVERTISEMENT