Address: | Borivali west | Website: | www.ryangroup.org/site/rcsborivali/about-school.php |
नमस्कार,
बोरिवली(प.) येथील 'Ryan International School' मध्ये शाळा ऑनलाइन सुरु असली तरी पालकांकडून 'Computer, Lab, Lib" ची वार्षिक 2970/- अतिरिक्त फीस वसूल केली जात आहे... मी सोबत ऑनलाइन फीस ची screenshot जोडली आहे.. ज्यात तुम्ही या फीसला टाळून पुढे पेमेंट करु शकत नाही... ही इयत्ता 1 आणि 2 ची स्थिति आहे...
KG आणि sr.KG ची परिस्थिती यापेक्षा गंभीर आहे.
चिमुरडी शाळेत जात नाहीत तरी "Activity Fees" च्या नावाने वार्षिक 3345/- अतिरिक्त वसूल केले जात आहेत. म्हणजे घरी पालकांनी Activity करायची आणि शाळेला फुकट Activity फीस भरायची.
गेल्या वर्षी संपूर्ण टाळेबंदी होती तरी या शाळेने पूर्ण फी वसूल केली, कुठलीही सूट दिली नाही.. आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला परंतु काही झाले नाही.
आताही जाब विचारल्यास आपल्या पाल्याला कशी वागणूक दिली जाईल या भीतीने कोणी काही बोलत नाही. परंतु म्हणतात ना, सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचे सोंग नाही आणता येत.
तोंड दाबून बुक्कयांचा मार आहे.
आपल्याकडून आम्हा पालकांना न्याय मिळेल आणि या कॉरपोरेट शाळांना चाप मिळेल अशी अपेक्षा...
आपला,
अनामिक Was this information helpful? |
Post your Comment