माननीय महोदय,
मी रोज सकाळी कात्रज ते गुडलक चौक असा नोकरी निमित्त प्रवास करते, माझी कामावर पोचण्याची वेळ ९ वाजता असते. मी रोज कात्रज वरून ८.०५ वाजताची २९९ - कात्रज ते भोसरी बस घेते. सकाळी ५ वाजता उठून, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून कामावर वेळेवर पोहोचणे आमच्यासाठी एक तारेवरची कसरत असते, तरी सुद्धा बस मुद्दाम हळू चालवून तुमचे बस कर्मचारी ते होऊ देत नाहीत. बस क्रमांक ००१४३६४, (२९९-कात्रज ते भोसरी - ८.०५ ) मी मोरे बाग पासून बसते, कंडक्टर बॅच नंबर ९३१८ ड्राइवर ला बस हळू चालवण्याबद्दल सूचना देत असतात, आणि मध्ये मध्ये बस बाजूला घेऊन मागच्या बस पुढे जाऊ देत अश्या सूचना देत असतात, माझी अशी नम्र विनंती आहे कि काहीतरी चांगला निर्णय घेऊन आम्हा सामान्य प्रवाशांचे हाल थांबवावेत. आम्हाला कामावर पोचायला उशीर झाला तर आमचे पगार कट करतात. आम्हाला एकही पगारी रजा नसतात. तरी कृपया काहीतरी योग्य निर्णय घ्यावा, जेणेकरून कोणालाच त्रास होणार नाही. Was this information helpful? |
Post your Comment