दिनांक- 2 जुलै 2021
प्रति,
मान.आयुक्त/ महापौर
ठाणे महानगरपालिका, ठाणे
अर्जदार- प्रमोद गुरुनाथ पवार
रा.अंबाडी, ता.भिवंडी जि. ठाणे
[protected] /[protected]
विषय- ठाणे शहरातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पार्किंगच्या नावाने नागरिकांकडून/ रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत असलेल्या बेकायदा वसुली बाबत…
महोदय,
मी या तक्रार अर्जाद्वारे आपणास कळवू इच्छितो की आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या ज्युपिटर या प्रसिध्द हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण हे ठाणे शहरातील तसेच ठाणे, पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आहेत. जेव्हा रुग्ण इथे दाखल होतो तेव्हा अनेकदा नातेवाईक एखादी स्वतःची किंवा भाडेतत्त्वावर एखादी कार घेऊन येत असतात. त्यावेळी त्यांना पार्किंग साठी जागा नसल्याचे सांगून वेठीस धरण्यात येते, नंतर त्यांना 100 रुपये ते 500 रुपये घेऊन valet parking देण्यात येते.
मी दिनांक 30 जून 2021 रोजी दुपारी जेव्हा या ठिकाणी माझ्या दाखल असलेल्या रुग्ण नातेवाईकाला भेटायला आलो तेव्हा माझ्या fortuner गाडीसाठी आधी सांगितले पार्किंग नाही, मग माझ्याकडून 100 रुपये घेतले व मला एक छोटी पावती दिली ज्यात कोणताही अधिकृत संदर्भ नाही. माझ्याकडुन पैसे मिळताच येथील स्टाफ ने मला पार्किंग उपलब्ध करून दिली.
या काळात लोक आधीच हतबल झाले आहेत, ज्युपिटर हे हॉस्पिटल आहे, कोणते मॉल, हॉटेल किंवा मौज मजा करण्याचे ठिकाण नाही, इथे रुग्ण हतबलतेने येत असतो. असे असताना हॉस्पिटल प्रशासन जर रुग्णांना असे वेठीस धरून अर्थिक लुबाडणूक करत असेल तर हे अत्यंत गंभीर आहे.
आपण याबाबत तातडीने कारवाई करून ही बेकायदा वसुली बंद करावी आणि नागरिकांना, रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा द्यावा ही विनंती. ज्युपिटर ने ही पार्किंगच्या नावाने सुरू असलेली लूट थांबवली नाही तर या ठिकाणी मोठे आंदोलन केले जाईल आणि त्यानंतर उद्भवलेल्या कायदा सुव्यस्थेला ज्युपिटर हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असेल याची कृपया नोंद घ्यावी.
धन्यवाद!
प्रमोद पवार
[protected]@gmail.com
[protected]/ [protected]
प्रत:
सर्व संबंधितांना रवाना.
Was this information helpful? |
Please investigate on this and get back.I will be giving an official complaint also regarding this and would like to know what actions have been taken.