[Resolved]  Maharashtra State Electricity Distribution Company — 11 KV Line हलवून बेकायदेशीर रित्या माझे हद्दीत टाकले बाबत

Address:Nashik, Maharashtra

विषय – वीजमंडळ अधिकारी श्री घरटे वं संबंधित महावितरणचे ठेकेदार यांनी माझ्यावर वं परिवारावर आणलेल्या प्राणहानी होणाऱ्या संकटाबाबत. बर्याच वर्षापासून प्रत्येक सटाणा परिसरात जैसे थे असलेली उच्च दाब क्षमतेची ११ के व्ही . ची टॉवर/इलेक्ट्रिक लाईन गेलेली आहे . हे इलेक्ट्रिक उच्च तारेचे खांब अनेक वर्षा पासून जेव्हा शेती होती तेव्हा पासून आहेत . जसजसा काळ बदलत गेला तसतशी मानवी वस्ती वस्त गेली नंतर शहरीकरण झाले. वं जेथे वस्ती होती तेथे प्लोट पडून बंगले वं कॉलनी निर्माण झाल्यात . तशी ही ११ के व्ही उच्च दाब क्षमतेची लाईन माझे घराचे बाजूचे ३०० मीटर पुढे असलेल्या चौकातून असलेल्या रिकाम्या प्लोट(जो हल्ली तोवर लाईन असलेमुळे विकला जात नाही ) मधून पुढे गणपत नगर येथे गेलेली आहे . या इलेक्ट्रिक लाईनी मुळे आजपर्यंत परिसरात मोठमोठे गंभीर अपघात होऊन मानवी प्राणहानी वं त्या खाली संपर्कात येणाऱ्यांना अपंगत्व आलेले आहे .आणि या बाबत वीजमंडळाकडे वं सटाणा पोलीस स्टेशन येथे दप्तरी नोंद देखील झालेल्या आहेत . ज्या लोकांनी इलेक्ट्रिक लाईन असतांना ह्या इलेक्ट्रिक लाईनी खाली स्वस्तात प्लोट मिळालेत म्हणून बांधकाम केलेते त्या संबंधितांनी वं सदर प्लोट व्यावसाईक खरेदी विक्री करणाऱ्या टोळी ने देखील शासनाकडे भरपूर पाठपुरावा केला, आंदोलन, मोर्चे चा ही उपद्व्याप केलाय आणि ही देखील सर्व नोंदी दप्तरी आहेत . ३ वर्षापूर्वी हीच टॉवर इलेक्ट्रिक लाईन काढणे साठी शासन दरबारी काही होत नाही म्हणून मागील दाराने जाऊन ... आता ज्या पद्धतीने ही इलेक्ट्रिक लाईन काढण्याचा प्रयत्न केला या पद्धतीने तसा प्रयत्न देखील केला होता . परंतु मा. न्यायालय ...सटाणा यांनी त्यावर Stay Order देवून स्थगिती दिली अशी आज पूर्ण परिसरात ही चर्चा आहे . मी मालेगाव येथे नोकरी करतो मुले शाळेत असतात पत्नी घरी नसते त्यामुळे घरी कुणीही नसते हे पाहून ६-ऑगष्ट -२०१४ रोजी सटाणा येथील महावितरण च्या ठेकेदाराने एवढे मोठे खांब आणून सिमेंटमध्ये गाडून तारा वगैरे फिरवून रिकाम्या असलेल्या प्लोट मधील तारा काढून सदर लाईन फिरवून मी रहात असलेल्या माझ्या हद्दीत ११ के व्ही इलेक्ट्रिक लाईन बसवून झटपट कार्यवाही केली . सायंकाळी माझी पत्नी आलेनंतर हा प्रकार पाहिल्या नंतर त्यांना अडविले तर तुमच्या हद्दीत नाही . बाजूला आहे वाटल्यास टोकर लावून पहा . शेवटी मी आल्यानंतर संबंधित अभियंता श्री घरटे यांचे कडे गेलो तर त्या दिवशी शनिवार आणि दुसऱ्या दिवशी रविवार ...साहेब घरी गेले सोमवारी भेटतील असे सांगण्यात आले. म्हणजे एकंदरीत सर्व नियोजित होते हे माझ्या लक्षात आले . नंतर मी संबंधित वार्डातील नगरसेवक यांना दाखवीले तर त्यांनी सांगितले की भाऊ आपल्या गावात ७ खांब मंजूर झालेत लाईट गेली की सर्व ठिकाणी वीज बंद करून काम करावे लागत होते पण आता तसे होणार नाही ... जेथे काम करायचे आहे तेथेच फक्त बंद करावे लागेल म्हणून हां खांब उभारला आहे . आणि येथे Cutout बसविणार आहेत . पण तरीही मला काही तरी कुठे चुकल्या सारखे वाटत होते . मी सोमवारी रजा टाकून नगरपरिषद सटाणा येथे चौकशी केली असता ... असे काहीही नाही ... असे सांगण्यात आले .. वं आज एक महिन्या नंतर एक ही खांब गावात बसविनेत आलेला दिसून आलेला नाही हे विशेष . त्यानंतर मी सविस्तर अर्ज घेऊन महावितरण ... मुख्य शहर कार्यालय ..सटाणा येथे गेलो तर तेथील वं फिडर कार्यालयातील मुख्य वं उप अभियंता हे दोन्ही ही पदभार /चार्ज श्री घरटे साहेब यांचे कडे असल्याचे समझले . मी पुन्हा घरटे यांचे कार्यालयात गेलो . त्यांचेशी या बाबत सर्व चर्चा केली सर्व समजावून सांगितले परंतु त्यांनी सांगितले ठीक आहे मला प्रत्यक्ष काय परिस्तिती आहे हे जागेवर आलेवरच पाहून सांगता येईल . तो पर्यंत मी काहीही सांगू शकत नाही . तसेच त्यांना विचारले की आपणाकडे असे काही आदेश आले आहेत का ? की ११ के व्ही इलेक्ट्रिक खांब एका ठिकाणा वरून दुसरीकडे हलवायचे ... परंतु या बाबत त्यांचे कडे काहीही उत्तर नव्हते . आणि आज ही त्यांचे कडे या बाबत काही ही उत्तर नाही . त्यानंतर मी थोड्या वेळात ठेकेदाराला घेऊन येतो असे सांगितले परंतु ते येण्याची चिन्हे काही दिसेना म्हणून मी त्यांना फोन आणि मेसेज ही केलेत. शेवटी सायंकाळी ६ वाजता ते आलेत . त्या वेळी वार्डाचे नगरसेवक श्री राजेंद्र सोनवणे यांना देखील मी बोलावून घेतलेले होते .यावेळी त्यांनी तसेच ठेकेदाराने पूर्ण परिसर नकाशा घेऊन परीक्षण वं निरीक्षण केला आणि सांगितले की तुमचे म्हणणे बरोबर आहे. आणि ठेकेदाराला आदेश दिलेत की हां खांब काढून दुसरीकडे टाक ...मला सांगितले की आजच्या आज नाही होणार हे भारनियमना च्या काळातच होईल वं ८ दिवसात होईल .; परंतु आज महिना झाला मी चकरा मारतो आहे, माझा मुलगा चकरा मारतो आहे त्यांना काहीही फरक पडलेला दिसून येत नाहीये . मी ४-९-२०१४ रोजी पुन्हा त्यांना स्मरणपत्र दिले परंतु माझ्या अडचणीची काहीही दखल घेतली जात नाही . मी मालेगाव वं नाशिक येथील वरिष्ट कार्यालयास सटाणा कार्यालयास दिलेल्या अर्ज, नकाशा यांचा email देखील केलेला आहे . माझ्या सारख्या चाक्र्मान्याने भविष्यात परिवार सुखी व्हावा, आयुष्यात पै पै जोडून, अडचणी सहन करून सर्व कर वेळेवर भरून नियमातील प्लोट, बांधकाम करायचे .आणि जर जर आयुष्यात जीवावर संकट येणाऱ्या वं फसवणूक होणाऱ्या गोष्टी घडणार असतील तर आमच्या सारख्या मध्यमवर्गीय परिवारांनी कुठे जायचे ... तरी माझी कैफियत मी आपणा पुढे मांडली आहे.. या उच्च दाब क्षमतेच्या इलेक्ट्रिक लाईन जी टाकली आहे ती नियमबाह्य असून माझ्या स्वतः च्या हद्दीतून टाकलेली आहे आणि विशेष म्हणजे वीजमंडळा चे कोणते ही नियम त्यांनी विचारात न घेता हे काम केलेले आहे . आणि श्री. घरटे वं संबंधित ठेकेदार श्री दत्ता (पूर्ण नाव माहीत नाही ) यांनी पूर्णपणे बेकायदेशीर काम करून माझ्या परिवारास वं माझे रहाते घरास धोका निर्माण केलेला आहे .कारण या धोकादायक ११ के व्ही इलेक्ट्रिक लाईन मुळे अनेक धोकादायक घटना घडलेल्या आहेत त्यामुळे मला वं माझ्या परिवाराला देखील केव्हा ही या पासून काहीही दुर्दैवी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे मात्र नक्की . आणि जर दुर्दैवाने काही अपघात किंवा दुर्घटना घडली तर संबंधित पूर्णपणे जबाबदार रहातील . कारण लाईन टाकणे नंतर तिसरे चं दिवशी त्याच ठिकाणी स्पार्किंग होऊन पूर्ण परिसरातील लाईट गेली होती . तरी माझी तक्रार नोंदून योग्य ती कार्यवाही आपणा मार्फत व्हावी ही आपणास विनंती आहे . तरी आपणास पुन्ह्च्य कळकळी ची विनंती की मला आपणा कडून न्याय द्यावा की जेणे करून महावितरण चे प्रशासन जागे होईल
+4 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Aug 14, 2020
Complaint marked as Resolved 
Complaint comments 

Comments

वीजमंडळ अधिकारी श्री घरटे वं संबंधित महावितरणचे ठेकेदार यांनी ही जी ११ के व्ही उच्च दाबाची लाईन चुकीच्या पद्धतीने टाकली याबाबत त्यांना वं संबंधितास अर्ज तसेच स्मरणपत्र देऊन ही अद्याप त्यांनी त्यावर एक ओळीचे खुलास तसेच याबाबत काहीही कार्यवाही केलेली नाही .
यांनी या चुकीच्या पद्धतीने कामाने दिनांक १३ सप्टेंबर २०१४ रोजी मोठा अनर्थ घडून आला . वेळीच सदर परिवार बाहेर मैदानावर आलेमुळे त्यांचे प्राण वाचले . त्याचे दैनिक सकाळ मध्ये आलेले वृत्त सोबत छायाचित्र ...

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Mahadiscom / MSEB / MSEDCL
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    12%
    Complaints
    4131
    Pending
    0
    Resolved
    504
    Mahadiscom / MSEB / MSEDCL Phone
    +91 22 2261 9100
    +91 22 2261 9300
    Mahadiscom / MSEB / MSEDCL Address
    Hongkong Bank Building, M.G. Road, Fort, Mumbai, Maharashtra, India - 400001
    View all Mahadiscom / MSEB / MSEDCL contact information