| Address: Thane, Maharashtra |
विरार (पश्चिम) मध्ये होत आहे स्टम्प वेन्दर (stamp vendor ) कडून खूप मोठा घोटाळा, स्टेशन जवळच असलेल्या मेघदूत बिल्डिंग मधील तिसर्या मजल्यावर असलेल्या बलराज सोलंकी ( वकील / मुद्रांक विक्रेता ) याचा कडून होत आहे स्थानिक नागरिकांची फसवणूक होत आहे. मूळ किमतीपेक्षा १० ते १५ टक्के बेकायदेशीर अधिक रक्कम घेतली जाते, यावर त्यांना जाब विचारलं असता "तू आम्हाला विचारणारा कोण आहे, आम्हाला सगळ्या ठिकाणी पैसे द्यावे लागतात, आमची वर पर्यंत ओळख आहे. "तू इथून चालता हो नाहीतर तुझा काही खर नाही अशा प्रकारे धमकी दिली. स्थानिक नागरिकांशी उद्धट प्रकारे बोलत, गपचूप पैसे द्या नाहीतर कोणाला स्टंप पेपर देणार नाही अशी भाषा वापरली.
मी अक्षय सुरेश भंडारी एक सामान्य नागरिक म्हणून आपणास विनंती करतो कि आपण आपले प्रतिनिधी प्रतक्ष घटना स्थळी पाठवून शहानिशा करून घ्यावी. दिवसाला अंदाजे ४०० ते ५०० स्टंप पेपर येथून होत आहे. दिवसाला प्रत्येक स्टंप पेपर मागे १३ रुपये हे गोळा करत आहेत. दिवसाला अंदाजे (१३ * ५०० = ६५०० रुपये ) ६५०० रुपये बेकायदेशीर अधिक रक्कम व महिन्याला ६५०० रुपये * २५ दिवस = १,६२,५००रुपये व वर्षाला १,६२,५००रुपये* ११महिने = १७,८७,५०० रुपये एका वर्षामध्ये.
मी विनंती करत आहे कि आपण नागरिकान मध्ये जनजागृती निर्माण करावी. काहिक लोकांना या बद्दल काहीच कल्पना नाही कि आपण देत असलेले पैसे वैध्य आहेत कि अवैध्य.
आपणास मी सर्व मदत करायला तयार आहे.
Was this information helpful? |
Post your Comment