Mahukar Kisan Kadam & Santosh Kisan Kadam — Unauthorized construction & Illegal construction

Address:सर्वे न.१३/१/२,६० फुटी रोड ,कृष्णराज कॉलनी ,पिंपळे गुरव ,पुणे

माननीय आयुक्त
पिंपरी चिंचवड मनपा

विषय :-पिंपळे गुरव येथील सर्वे नंबर १३/१/२ मध्ये फुटपाथ वरती करत असलेल्या अनधिकृतपणे टपर्‍यांवरती कारवाई करणे बाबत

आम्ही अर्जदार राहणार पिंपळे गुरव पिंपळे गुरव येथील सर्वे नंबर १३/१/२ येते काही भाग फूटपाथ व काही भाग स्वतःचे मालकि नसलेल्या जाग्यावरती श्री कदम हे अनधिकृत गाळे बांधत आहे पूर्वी त्यांनी टपऱ्या उभ्या करून भाड्याने दिल्या होत्या परंतु आता त्यांनी त्या टपर्‍या काढून पक्के बांधकाम करण्याच्या तयारीमध्ये दिसत आहेत व त्या अनाधिकृत टपऱ्यांमुळे फुटपाथ पूर्णपणे बंद होऊन जातो व रोड वरती पार्किंग केले जाते त्यामुळे तेथे वाहतूक कोंडीची समस्या तयार होते तरी आपणास विनंती आहे सदर होणाऱ्या या अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यात यावी ही विनंती

धन्यवाद आपले विश्वासू
श्री स्वामी समर्थ
+4 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Jul 10, 2022
Updated by Om Swami
आम्ही या आधी जी तक्रार केली आहे त्या अनधिकृत काम हे अजून पण चालू आहे ह्या अनधिकृत बांधकामा बाबत अजून कोणतीच कारवाई झाली नसून ते अनधिकृत बांधकाम हे सुरळीत चालू आहे ह्या होणाऱ्या अनधिकृत बांधकामा मुळे पूर्ण फुटपाथ बंद होऊन वाहतूक कोंडी होत आहे व ह्या बांधकामाचा त्रास येथील सर्व नागरिकांना होत आहे हे काम रात्री २ वाजेपरीयंत चालू असते बरेच नागरिक हे सर्विस करणारे, शाळेत जाणारी लहान मुले, आजारी माणसे यांना सगळ्यांना त्रासदायक आहे .तरी आपणास हि विनंती कि ह्या चालू असलेल्या अनधिकृत बांधकामावर लवकरात लवकर कारवाई व्हावी हि कळकळीची विनंती
Sep 30, 2022
Updated by Om Swami
महोदय, आम्ही या आधी जी तक्रार केली होती ते अनधिकृत काम हे पुन्हा चालू झाले आहे.ह्या अनधिकृत बांधकामा बाबत अजून कोणतीच कारवाई झाली नसून ते अनधिकृत बांधकाम हे काही दिवस बंद ठेवण्यात आले होते पण आता ते अनाधिकृत बांधकाम पुन्हा सुरळीत चालू आहे.तरी आपणास हि विनंती कि ह्या चालू असलेल्या अनधिकृत बांधकामावर लवकरात लवकर कारवाई व्हावी हि कळकळीची विनंती.
Oct 02, 2022
Updated by Om Swami
कमिशनर साहेब आम्ही या आधी तुमच्याकडे ६ वेळा २७ जून २०२२ पासून तक्रारीचा मेल करत आहोत पण अजून सुद्धा त्या बेकायदेशीर रित्या होत असलेल्या अनधिकृत बांधकाम विरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही तुमचे पालिकेतील काही अधिकारी येऊन तिथले फोटो व्हिडीओ काढून घेऊन गेले तरी सुद्धा अजून कोणतीच कारवाई होत नाहीये. त्यांच्या या अनधिकृत बांधकाम मुळे त्यांनी फुटपाथ बंद करून आत मध्ये सुरळीत रित्या बांधकाम चालू आहे त्यांनी पूर्ण फुटपाथ कापड लावून बंद केले आहे तरी सुद्धा पालिका त्यांच्यावर कोणतीच कारवाई का करत नाहीये. येथील सर्व रहिवाश्याना त्यांच्या अनधिकृत कामामुळे त्रास होत आहे . कायद्याचे उल्लंघन करून देखील हे लोक निडर होऊन त्यांचे हे अनधिकृत काम सुरळीत करत आहेत साहेब तुम्हाला आमची हात जोडून विनंती आहे पिंपळे गुरव ६० फुटी रोड वर होत असलेल्या या अनधिकृत बंधकांमांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी हि कळकळीची विनंती.
Feb 25, 2023
Updated by Om Swami
गेले ८-९ महिने झाले आम्ही या अनधिकृत बांधकाम विषयी तक्रार करत आहोत तरी देखील पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची कोणतीच कारवाई अद्याप झाली नाही असे का? ते अनधिकृत बांधकाम पुन्हा दुसऱ्या मजल्याचे बांधकाम हे फुटपाथवर बाल्कनी काढून सुद्धा त्याच्यावर कारवाई का होत नाहीये ? महानगर पालिका अश्या अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करत आहेत हे दिसून येत आहे .

Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    सर्वे न.१३/१/२,६० फुटी रोड ,कृष्णराज कॉलनी ,पिंपळे गुरव ,पुणे
    India
    File a Complaint