Pune University — education related complaint university of pune

Address:411007
Website:googleweblight.com/i?u=exam1.unipune.ac.in/auth/login_student.aspx&hl=en-IN

Pune University & UGC
नमस्कार साहेब.
साहेब एक विनंती आहे पुणे विद्यापीठ शिक्षण संदर्भात - -
२००८ पॅटर्न नुसार मुदत २०१९ - ११ वर्षे.
२०१३ पॅटर्न नुसार मुदत २०१७ - ०४ वर्षे.
आम्हासर्व पॅटर्न २०१३ या विद्यार्थ्यांनवर अन्याय का...??? एम. एस्सी. रसायनशास्त्र पॅटर्न २००८ नुसार त्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर कालावधी दोन वर्षे सोडून २०१९ पर्यंतची बॅकलॉग राहिलेले विषय क्लेयर करण्यासाठी मुदत दिली आहे. व त्या नंतर जर का तो विद्यार्थी राहिलेले विषय क्लेयर केला नाही तर त्याला २०१९ नंतर पुन्हा प्रवेश घ्यावा लागेल.
मग एम. एस्सी. रसायनशास्त्र पॅटर्न २०१३ या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर कालावधी दोन वर्षे सोडून बॅकलॉग राहिलेले विषय क्लेयर करण्यासाठी फक्त त्या पुढिल दोनच वर्षे मुदत देण्यात आली आहे. म्हणजे २०१७ पर्यंत मग आमच्यावरच हे अन्याय का...???
या कालावधीत राहिलेले बॅकलॉग विषय क्लेयर केला नाही तर पुर्ण पद्दव्युत्तर रद्द करुन पुन्हा नव्याने प्रवेश घ्यावा लागेल व पुर्ण फि आकारला जाईल... जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश फी भरने कष्टाचे जाईल. आणि फि हि हजारोंच्या पटित आहे.
आम्हासर्व पॅटर्न २०१३ या विद्यार्थ्यांनवर अन्याय का...???
( साहेब माझ्या सोबत माझे बरेचसे मित्र आहेत जे गरीब व होतकरू आहेत. आमचे शेवटच्या सेमिस्टर चे एकच विषय राहिलेल आहे. आणि मुदत दोनच वर्षे दिल्यामुळे आम्ही सर्वजण आमच्या कॉलेज च्या आफिस मध्ये संपर्क केला त्या वेळी ते आम्हाला दोन दिवस वेळ द्या चौकशी करून तुम्हाला कळवतो असे सांगितले, ) दोन दिवसा नंतर परत आम्ही आमच्या कॉलेज च्या आफिस मध्ये गेल्यावर त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्हाला शेवटची एक संधी मिळाली आहे असे सांगितले. आम्ही त्यांना धन्यवाद व आभार मानले व तेथून निघून गेलो. )
साहेब आता आम्ही एक्झाम फार्म भरण्यासाठी नेट वर गेलो पण तिथे केवळ २००८, २०१४ पॅटर्न चे फार्म उपलब्ध आहेत. व रसायनशास्त्र पॅटर्न २०१३ वगळता बाकी सर्व विभागाचे २०१३ पॅटर्न चे परीक्षा फॉर्म संकेतस्थळावर उपलब्ध आहेत... (unipune Examination - exam form online) २०१३ पॅटर्न रसायनशास्त्र विभागाचे काहीच माहिती दिसत नाही. म्हणून आमच्या महाविद्यालयाच्या कार्यालयात चौकशी करण्यासाठी गेले असता त्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. म्हणून आम्ही सगळे विद्यार्थी पुणे विद्यापीठ येथील एक्झाम सेक्शनमध्ये व कुलसचिव यांना संपर्क केले असता त्यांनी सांगितले की युजीसी तर्फे आम्हाला या विषयावर अजुन काही माहिती मिळाली नाही. जर युजीसी काही निर्णय घेतला तर काही करता येईल असे सांगितले.व महाराष्ट्र राज्यातील बरेच विद्यार्थी आहेत ज्यांचे क्वचित एक दोन विषय राहिलेले आहेत.
( २००८ पॅटर्न प्रमाणे मुदत २०१९ राहिलेले बॅकलॉग विषय क्लेयर करण्यासाठी २०१९ मुदत दिली आहे. त्या नुसार शासनाने आम्हाला हि पॅटर्न २०१३ या विद्यार्थ्यांना राहिलेले बॅकलॉग विषय क्लेयर करण्यासाठी मुदत वाढवून द्यावे व परीक्षेचे फार्म भरुन घेऊन आम्हा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची अनुमती द्यावे.)
आम्हासर्व पॅटर्न २०१३ या विद्यार्थ्यांनवर अन्याय होऊ नये म्हणून साहेबांना नम्र विनंती आहे की त्यांनी या विषयावर चर्चा करून आम्हाला योग्य तो निर्णय द्यावा... म्हणून साहेबांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर पुणे विद्यापीठ आणि युजीसी येथे संपर्क साधून अन्याय झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा. हि नम्र विनंती...
Sent from Arjun Vanpratiwar.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Ganeshkhind Pune
    India
    File a Complaint