Zee Marathi — Daily soap containt

माझी झी मराठी ला नम्र विनंती आहे की,
झी मराठी family show साठी ओळखले जाते. आपण, देवमाणुस, लई भारी कारभारी अश्या प्रकारच्या कथा प्रदर्शित करु नयेत. कारण आपण जे पाहतो तसेच आमलात आणण्याचा प्रयत्न करतो. आणि जर अश्या मालिका सुरू राहिल्या तर आपणाकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रित्या समाजाची दिशाभूल केली जाईल.

आपणाला माहितीच आहे की अभिनेत्यांच अनुकरण हे अधिक लोक करत असतात. मालिकेतील अभिनेते जर काही दुष्कृत्य करत असतील. तर त्याचे ही अनुकरण केले जाते.

आपला असा प्रयत्न असला पाहिजे की जनसामान्य लोक आपल्या मालिकेतून काही चांगल शिकतील. व त्यांची काही मदत होइल. त्यातून 1नविन समाज घडेल. आपली संस्कृती जगभराला समजेल, आणि आपल्या कलेच प्रदर्शन होइल, आपला इतिहास दूर पर्यंत जाऊन पोहोचेल. आणि आपल्याला आपल्या संस्कृतीचा गर्व वाटेल.

आणि वरिल सारख्या मालिका जर प्रदर्शित होत असतील तर नविन पिढीने यातुन काय शिकावे? किंवा इतर प्रदेशात, देशात आपल्या संस्कृती चा अनादर होइल.
जर मनोरंजनाच्या नावाखाली आपण जर अश्या मालिका सुरू ठेवणार असाल तर नूकसान आपले च आहे. आपल्या संस्कृती चे आहे.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    India
    File a Complaint