Address: | At post Birwadi, Taluka shahapur, Dist Thane, 421603 |
मा. व्यवस्थापक (सर्व्हिस)
orient electric company
orient कंपनीचा टेबल फॅन (Tabel-27), दि.30.03.2021 रोजी खरेदी केला असून दि.27.06.2021 रोजी (फक्त 3 महिन्यातच) तो नादुरूस्त झाला आहे. त्यासाठी आपल्या सर्व्हिस सेंटर मध्ये ([protected]) संपर्क साधला असता 24 ते 48 तासात आपल्याला सुविधा पुरविण्यात येईल, असे सांगण्यात आले.
• दि.26.06.2021 रोजी तक्रार नोंदणी क्र.C[protected] असा असल्याचा संदेश (मेसेज)आला.
• दि.27.06.2021 रोजी आपली तक्रार रद्द (Cancelled) असा असल्याचा संदेश (मेसेज) आला.
• दि.28.06.2021 रोजी orient सर्व्हिस सेंटर पुन्हा संपर्क साधला असता, 24 ते 48 तासात आपल्याला सुविधा पुरविण्यात येईल, असे सांगण्यात आले.
• दि.30.10.2021 रोजी आपल्या टेक्निशियनकडून सांगण्यात आले की, 2 दिवसांत सर्व्हिंस देतो पण ते आजपर्यंत सर्व्हिस देण्यासाठी आलेले नाहीत.
• दि.06.07.2021 रोजी पुन्हा orient सर्व्हिस सेंटर पुन्हा संपर्क साधला असता 2 मोबाईल नंबर ([protected] व [protected] )देण्यात आले असून त्यांच्याशी संपर्क साधण्याबाबत सांगण्यात आले. सदर मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता संबंधित टेक्निशियने शहापूर विभागात सर्व्हिस पुरविणे त्यांच्या कार्यकक्षेत येत नसल्याबाबत सांगितले. तर दुसऱ्या मोबाईल वर संपर्क साधला असता, चुकीचा नंबर असे सांगण्यात आले आहे.
दि.08.07.2021 रोजी पुन्हा orient सर्व्हिस सेंटर पुन्हा संपर्क साधला असता 24 ते 48 तासात तुम्हाला सर्व्हिस देण्यात येईल, असे सांगितले जाते, परंतु प्रत्यक्षात आजपर्यंत आपल्या कंपनीकडून सर्व्हिस दिली जात नाही.
तरी आता मी किती वेळा orient सर्व्हिस सेंटरकडे संपर्क करावा, म्हणजे orient कंपनीचा टेबल फॅन (Tabel-27) जो खरेदी केल्यानंतर फक्त 3 महिन्यातच खराब झाला आहे तो मला दुरूस्त करून मिळेल.
आता तरी माझ्या तक्रारीची दखल घेण्यात यावी, ही विनंती.
गणेश भेरे, ([protected])
Was this information helpful?
Post your Comment