Acumeus — job fraud

Address:Office No 109 Clover Center 1st Floor Moledina Road M.G Road. Pune Camp 411001, Pune, Maharashtra

मी नोकरीच्या शोधात होतो. तेव्हा मी naukri.com या ऑनलाईन साईट वरती माझी नोंद केली. तेव्हा पुण्यातील एका कंपनी मधुन मला फोन आला व त्यांनी मला त्यांच्या ऑफिसला इंटरव्हयू साठी बोलावल. तिथे गेल्यावर समजल की ही एक नोकरी देणारी संस्था आहे (24.12.2019). तिथे ऑफिस मधे एकुण 9 जण होते (5 मुली आणि 4 मुले होते) खुप नवीन विद्यार्थी ही होते तेही इंटरव्यू साठी आलेले. इंटरव्हयू साठी आत गेलो. मुलगी इंटरव्हयू घेत होती इंटरव्हयू झाला. आणि लगेच त्या मुलीने पैशाची मागणी केली मला काही कळण्याच्या आत ती म्हणाली की पैसे दिले तर दुसरा राउंड होईल. त्यात तुम्हाला घेतला तर पैसे पगारासोबत जमा होतिल जर नाही घेतला तर तुमचे पैसे तुम्हाला भेटतील लगेच म्हणून मी 1800 रुपये कार्ड पेमेंट केले (कैश नव्हते म्हंटल तर तिने swipe मशीन काढली) त्यानंतर त्यांनी थांबायला लावल. बाहेर थांबलो असता माझ्या लक्षात काही गोष्टी आल्या की ना त्या ऑफिस मधे त्याच्या संस्थेच नाव होत ना कुठे कैमरा. लगेच त्यांनी दुसर्या राउंडला बोलावलं आत गेलो असता त्यांनी परत तसाच इंटरव्हयू घेतला व कॉल वर इंटरव्यू होईल असा बोलले. त्यांनी कॉल लावुन दिला तिकडून एक महिला बोलत होत्या त्यांनी असेच प्रश्न विचारुन म्हणाल्या की अभिनदंन तुम्ही सिलेक्ट झाले आहात. तिथे असलेल्या मुलीनी एका पानावर लिहुन दिला परत ट्रेनिंग साठी आणि इंटरव्हयू साठी व 1000 रुपये घेउन जायच (त्यांनी दिलेल्या पत्त्यावरती). मला शंका यायला लागली. जाताना म्हणाली ते पान खिशात ठेवून जा. बाहेर आल्यावर मी गूगल वरती त्यांनी दिलेल्या पावती वरचा नाव टाकुन शोधला असता. त्यांच्या संस्थेच्या तक्रारी दिसल्या. मला समजल आपली फसवणूक झाली आहे ते. मी त्यांना विचारल असता अरेरावीची भाषा केली. आणि पैसे नाही देणार अशी उत्तरे दिली. पुण्यात ग्रामीण भागातून आलेली किंवा पुण्यातील मुले नोकरीच्या शोधात असतात. व अश्या संस्था नोकरी देण्याच्या आमिषाने त्यांची फसवणूक करतात. दुसर्या शहरात असल्यामुळे ही मुल काही करु ही शकत नाही. एका मुलाकडून एवढी रक्कम घेतात विचार करायला भाग पडणारी गोष्ट आहे किती पैसे लुटत असतील हे.
पुण्यात किंवा औद्योगिक क्षेत्रात अश्या गोष्टी खुप मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. बेरोजगारीमुळे कुठे काम हाती लागत नसल्यामुले मुले ही यांच्या जाळ्यात अडकतात.

संस्थेचे नाव : acumeus requirement pune. (Emerald green)
पत्ता :office no 109 clover center 1st floor moledina road m. G road. Pune camp 411001
+2 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Office No 109 Clover Center 1st Floor Moledina Road M.G Road. Pune Camp 411001, Pune
    Maharashtra
    India
    File a Complaint