Archana — :Wadala depot manager Mr

Address:hindmata

माननीय महोदय,

संदर्भ:बेस्ट बस क्रमांक ४४०LTD ४०LTD सांदर्भात तक्रार करून ही wadala depot मधून कोणतीही कारवाही केली नाही
विषय :Wadala depot manager Mr गोरे यांचा विरोधात तक्रार

आपणाला कळवण्यात मला अत्यंत दुःख होत आहे की, wadala depot manager Mr गोरे सर, त्यांना 440 Ltd बस नंबर आणि 40 Ltd या बस क्रमांक संदर्भात आम्ही खूप वेळा तक्रार करून ही त्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही आहे. अद्याप आम्हाला होणार त्रास कायम आहे. आम्हाला सकाळी 8-9.30 दरम्यान वेळेत बस भेटत नाही wadala depot मधे ही खूप वेळ आम्ही रांगेत उभ रहावे लागत आहे तरी सुद्धा एसी बस येतात एसी बस एकतर टाईम मधे पोचवत नाहीत आणि त्यांना इतकी गर्दी असते की लोकांना पाय ठेवायला जागा नसते .सध्या बस मधे आम्हाला कंडक्टर आणि ड्रायव्हर घेत नाहीत मग एसी बस मधे इतकी गर्दी चालते का., कोरोना हा एसी बस मधे पसरू शकत नाही का आणि सांध्या बस मधून च पसरतो का असा गैरसमज आहे का? बस नंबर 440Ltd ani 40 bus ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना आणि wadala depot manager Mr गोरे सर यांना ही.

असो आम्हाला wadala depot manager Mr Gore sir यांचा विरोधात तक्रार दाखल करायची आहे .
आम्ही सतत email आणि फोन करून तक्रार करून ही त्याच निवारण होत नसेल तर दाद कुठे मागावी तेच समजत नाही..
तरी आम्हाला या संदर्भात काय कारवाही करण्यात येईल त्याचा reply ची आम्ही वाट पाहत आहोत.

आम्ही रोज हिंदमाता ते गुंडवली असा प्रवास करत असताना सकाळी जी आमची बेस्ट तर्फे होत आहे तीच परवड संध्याकाळी गुंडवळी ते हिंदमाता असा प्रवास करतेवेळी होते.आता खूप च घुसमट आणि त्रास होत आहे. रोज आम्ही बस मधे चढणे साठी धावाधाव करून इतर दुखापती येत आहेत.आम्हाला होणाऱ्या दुखापती साठी कोण जबाबदार असेल तेच समजत नाही.
आम्ही घरी काम सोडून बसू शकत नाही रेल्वे साठी दोन लासिंचे बंधन ठेवले आहे मग अशा वेळी आम्हाला बस च प्रवास योग्य वेळेत होत नसेल तर काय फायदा. बस एक तर आली तर थांबत नाही आणि थांबली तर बस स्टॉप च्या मागे किंवा पुढे नेऊन थांबवता हे करून काय साध्य होत ते समजत नाही. बस मधे उभे राहण्यासाठी जागा असेल तरी बस थांबवत नाहीत.
पुढे जाऊन हनुमान रोड वर याच गर्दी असलेली आणि गर्दी नसलेली रिकामी बसेस तिथल्या प्रवासी लोकांना घेतात मग आम्ही इथे संध्याकाळी ५.१५ पासून उभे राहून आम्हाला रात्री८ पर्यंत बस थांबवत नाहीत याचा मला थांगपत्ता लागत नाही.मग या गुंडवाली बस स्टॉप वर माणसे आहे की आम्ही एखादे जानवर आहोत असे वाटून राहिला.कमाल उभे प्रवासी च बंधन काय फक्त संध्याकाळी गुंदवाली स्टॉप वर आणि सकाळी हिंदमाता स्टॉप वर आहे असेच दिसून येत आहे.
सकाळी हिंदमाता बस स्टॉप वर ही हाच अनुभव येत आहे आम्हाला सांगण्यात येत की तुम्ही दादर सर्कल जवळ येऊन बस मिळेल पण दादर सर्कल पर्यंत आम्हाला रोज चे ५/- तिकीट चे पदरचे मोडवे लागतात. आम्हाला रोज च हा भुर्दंड का पण. जर हिंदमाता बस स्टॉप वर १-३ प्रवासी असतील तरी का घेत नाहीत आणि पुढे दादर सर्कल ल तुम्ही कसे काय आणि कोणत्या निकष वर घेता आहात तेच समजत नाही.

रोज होणाऱ्या त्रासाचा आम्हाला कंटाळा आला आहे. आज ही आम्ही गुंदवली बस स्टॉप वर संध्याकाळी५:१५ पासून उभे आहोत अद्याप ६:४५ पर्यंत साधी बस एकही थांबली नाही थांबली असेल तर ती बस स्टॉप पुढे किंवा मागे थांबवत आहेत.
रोज रोज बस साठी पदरचे एक्स्ट्रा घालवून ही आम्हाला बस उपलब्ध होत नसेल तर काय फायदा आहे .तक्रार करूनही आम्हाला wadala डेपो मधून टोलवा टोलवी ची उत्तरे मिळत आहेत. आम्हाला बस चे फोटो पाठवा सांगत आहेत. आम्ही बस साठी मागे पुढे धावणार की फोटो काढत बसणार. रिकाम्या बस पुढे नेऊन काय सिद्ध करीत आहेत .त्या ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना डेपो कडून असा सांगण्यात आलं आहे की गुंदावळी आणि हिंदमाता स्टॉप वर बस थांबवायची नाही. असा का आणि का केलं जातं आहे.

साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती करीत आहे या संदर्भात कृपा करून डेपोट manager Mr Gore यांचा विरुद्ध काही तरी कार्यवाही करा .
आपण कोणती आणि काय कारवाही केली आहे त्याची आम्ही वाट पाहत आहोत.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    hindmata
    India
    File a Complaint