Mahadiscom / Mseb / Msedcl — Illegal p.d.

Address:Shriram Ward, Chandrapur

..दिनांक 28.06.2021
प्रति,
अध्यक्ष,
महावितरण,
प्रकाशगड,
मुंबई

आदरणीय महोदय,
विषय:- ग्राहक क्रमांक[protected]
बेकायदेशररित्या विद्युत पुरवठा
खंडित केल्याप्रकरणी
[protected][protected][protected]
मी खाली सही करणार सध्या राहणार श्रीराम वॉर्ड चंद्रपूर नम्रपणे आपले निदर्शनास खालील गोष्टी आणू इच्छितो -
१. मी महावितरण चा ग्राहक असून ग्राहक क्रमांक[protected] हा आहे व माझे घर वडगाव, चंद्रपूर येथे आहे. डिविजन 2160 चंद्रपूर असा आहे.
2. मी बँक ऑफ इंडिया मध्ये मुख्य प्रबंधक पदावर कार्यरत होतो. तेव्हा माझी मुंबई, अहमदाबाद अशा अनेक ठिकाणी बदली झाली त्यामुळे माझे घर बंद होते. तशी सूचना मी वेळोवेळी आपले चंद्रपूर येथील संबंधित कार्यालयास दिली होती. दिनांक 31.08.2017, 14.09.2018 चा अर्ज माहितीसाठी सोबत जोडत आहे.
3. फेब्रुवारी 2018 पर्यंत महावितरण ने बंद घराचे नियमाप्रमाणे बिल दिले. मार्च 2018 पासून अचानक महिना रू. 1500 चे वर बिल देणे चालू केले. ते वाढत वाढत रू. 7680 पर्यंत पोहचले. मी अर्ज दिल्यानंतर ते मार्च 2019 पर्यंत अग्रिम रकम म्हणून रू. 1300 असे दुरुस्त करून दिले. त्याचा भरणा मी 18.09.2018 ला केला. (रसीद सोबत जोडत आहे).
४.जरी मला बिल रू.7680 चे 1300 करून दिले तरी ऑफिस रेकॉर्ड वर ते दुरुस्त केले नाही व बिल तसेच वाढत राहून रू. 13000/- वर पोचले. मी गुजरात येथे ऑडिट विभागात काम करीत होतो त्यामुळे मला वैयक्तिक चंद्रपूर ला येणे झाले नाही. तरी मी वेळोवळी फोन व email द्वारा आपले कार्यालयास कळविले परंतु काही कार्यवाही झाली नाही.
५. मी दिनांक ३०.०६.२०१९ ला बँकेतून सेवानिवृत्त झालो व जुलै मध्ये चंद्रपूर ला परतल्यानंतर मला असे समजले की माझे विद्युत कनेक्शन जानेवारी २०१९ मध्ये बेकायदेशररित्या खंडित केले आहे. मार्च २०१९ पर्यंत अग्रिम पैसे भरले असताना जानेवारी २०१९ मधे पुरवठा कसा खंडित केला हे विचारणा करण्याकरिता मी बंगाली कॅम्प परिसरातील अधीक्षक अभियंता कार्यालयात गेलो तेव्हा तेथील कर्मचारी श्री जिवतोडे अत्यंत उद्धटपणे बोलले व मला consumer forum मध्ये जा व वरून म्हणाले की शेकडो केस मध्ये अजून एक केस वाढली तर आम्हाला फरक पडत नाही. त्यावेळी माझे सोबत माझे बालमित्र गजानन नीलकंठ दारवेकर हे देखील होते (श्री दारवेकर महावितरण मधून लेखापाल म्हणून सेवानिवृत्त झाले होते).
६. त्यानंतर आम्ही बाबुपेठ कार्यालयातील मुख्य अभियंता श्री कुरेकार साहेबांना भेटलो. त्यांनी आम्हाला बंगाली कार्यालयातील अभियंता श्री मानकर साहेब ह्यांना भेटण्यास सांगितले. नंतर आम्हास असे सांगण्यात आले की विद्युत पुरवठा खंडित होऊन ६ महिन्यांचा वर कालावधी पूर्ण झाले मुळे तांत्रिक दृष्ट्या पुरवठा सुरू करता येत नाही व मला नवीन कनेक्शन साठी अर्ज देण्यात सांगितले.
७. जरी माझी काही चूक नव्हती, तरी उगाच संघर्ष टाळण्यासाठी, त्यांचे सुचणे नुसार मी नवीन कनेक्शन साठी दिनांक 17.05.2020 ला अर्ज केला. तो अर्ज करूनही १ वर्षाचे वर कालावधी उलटून गेला परंतु अजून पर्यंत काही हालचाल व निर्णय नाही. आता मला असे सांगत आहे की नवीन नियमानुसार एका नावावर २ मीटर देता येत नाही. संबधित मीटर माझे कडे मागील ३० वर्षापासून होते जे बेकायदेशररित्या काढून नेले. घर बंद होते असा रिपोर्ट स्वतः कापसे साहेब ह्यांनी दिला. त्यानंतर ऑफिसने बिल शून्य असे केले परंतु अजूनपर्यंत मीटर लाईन दिली नाही.
मी रामनगर येथील अभियंता श्री कापसे साहेबांना वेळोवेळी भेटलो परंतु ते मीटर देण्यास टाळटाळ करत आहे. आता मला असे सांगितले की अर्ज करून ६ महिन्यांचा कालावधी उलटला असल्याने नवीन अर्ज करावा. त्यानुसार दिनांक १७.०६.२०२१ ला पुन्हा अर्ज केला त्याचा नंबर.३१८१०७०६ हा आहे परंतु अजूनही काही कार्यवाही नाही व मला विनाकारण शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू आहे. सध्याचे बिल पाहिले जून 2021 तरी ते उने रू.570 दाखवत आहे ह्याचा अर्थ माझे अजूनही वीज मंडळाकडे रू.570 जमा आहेत. तसेच माझे मीटर deposit चे जमा आहे..तरी वीज कनेक्शन खंडित केले हे सर्वस्वी बेकायदेशर आहे.
९. मी अनेक वर्ष बँकेत व त्यापूर्वी पोलीस विभागात काम केले होते. प्रत्येक विभागात मनुष्यबळ कमी असल्याने सर्व तणावात असतात ह्याची मला जाणीव आहे. तसेच माझे बालमित्र श्री दारवेकर जे महावितरणचे कर्मचारी होते त्यांचे मागील वर्षी कोरणा मुळे निधन झाले, त्यांचे सांगण्यावरून मी इतके दिवस शांत व संयमाने राहिलो. परंतु जवळपास २ वर्ष उलटूनही काही निर्णय होत नसल्याने मला माझी कैफियत आपलेपुढे मांडणे भाग पडत आहे.
१०. माझे सारख्या शिक्षित ( B.COM, LL.B) माणसाला जर इतका त्रास सहन करावा लागत असेल तर सामान्य नागरिकाला काय भोगावे लागत असेल ही कल्पना करू शकतो. मी वरिष्ठ नागरिक असल्याने मागील वर्षीपासून चे लॉकडाऊन मुळे घराबाहेर जास्त निघू शकत नाही.
११.ह्या अर्जाद्वारे मी आपणास विनंती करतो की माझे बेकायदेशररित्या खंडित मीटर ३० दिवसाच्या आत लाऊन द्यावे व माझे सारख्या वरिष्ठ नागरिकाला विनाकारण जो त्रास सोसावा लागला त्याकरिता रामनगर चे अभियंता श्री कापसे साहेब व बंगाली कॅम्प परिसरातील अधीक्षक अभियंता कार्यालयात काम करणारे अधिकारी श्री जीवतोडे हयांचेवर उचित कार्यवाही करावी.
१२. आपणाकडून योग्य सहकार्याची अपेक्षा असून आपण मला आंदोलन करण्यास भाग पडणार नाही ही अपेक्षा आहे. धन्यवाद.

आपला विश्वासू,

श्रीकांत रामचंद्र त्रिपुरवार
फोन नंबर [protected]

प्रतीलीपी -

१.माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय, मुंबई.
२. माननीय श्री नितीनजी राऊत साहेब,
ऊर्जा मंत्री, महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय मुंबई
३. माननीय श्री किशोरभाऊ जोरगेवार साहेब,
आमदार, चंद्रपूर.
४. कार्यकारी अभियंता,
महावितरण, बाबूपेठ, चंद्रपूर.
५. उप कार्यकारी अभियंता,
महावितरण, बंगाली कॅम्प
चंद्रपूर
६. कनिष्ठ अभियंता,
महावितरण,
रामनगर, चंद्रपूर.

माहिती व उचित कार्यवाही करावी ही विनंती.

पत्ता -
श्रीकांत रामचंद्र त्रिपुरवार
श्रीराम वॉर्ड, पाच देऊळ जवळ
चंद्रपूर महाराष्ट्र
पिन 442402
फोन नंबर.[protected]
Was this information helpful?
No (0)
Yes (1)
Jul 07, 2021
Updated by Stripurwar
Complaint not yet resolved.
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Mahadiscom / MSEB / MSEDCL
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    12%
    Complaints
    4132
    Pending
    0
    Resolved
    504
    Mahadiscom / MSEB / MSEDCL Phone
    +91 22 2261 9100
    +91 22 2261 9300
    Mahadiscom / MSEB / MSEDCL Address
    Hongkong Bank Building, M.G. Road, Fort, Mumbai, Maharashtra, India - 400001
    View all Mahadiscom / MSEB / MSEDCL contact information