Mahadiscom / Mseb / Msedcl — without new meter reading unauthorized bill as per old faulty meter

Address:Thane, Maharashtra, 400612

महोदय,
मी, तानाजी रामचंद्र पोकलेकर, इथे नमूद करू ईच्छितो की माझा नवीन ग्राहक क्रमांक ४२५६७९६९ असून जुना ग्राहक क्रमांक ०९६२०८६३४३१ असा होता. गेले कित्येक महिने मला अतिशय जास्त प्रमाणात वाढीव बिल येत होते आणि मी त्या संदर्भात वेळोवेळी महावितरण कार्यालयात त्याची तक्रार ही दाखल केली. त्याचा परिणाम असा झाला की मला माझे फॉल्टी मीटर आहे असे समजले आणि बिल योग्य प्रमाणात करून घेण्यासाठी कार्यालयात तक्रार नोंदविण्यास सांगितले. सुचविल्याप्रमाणे मी योग्य ते केले आणि त्याचा परिणाम असा झाला की मला नेहमी ह्या कार्यालयातून त्या कार्यालयात, त्या कार्यालयातून ह्या कार्यालयात अशी माझी सतत पीटाळना करण्यात आली आणि परिणाम मात्र झाला शून्य. दर महिना तेच तेच बिल येत राहीले आणि महावितरण कडून कृतीशून्य भावेनाचा अनुभव घेण्यास मिळाला. एरवी कोणाच्याही तक्ररीपुढे बहिरी राहणारी आणि कासवाच्याही गतीला लाज आणणारी अतिशय कामचुकार अशी महावितरण संस्था आता वीज तोडनीबाबात अगदी सशाच्या गतीने काम करू लागली होती.
गेल्या वर्षभरात मी नोंदवलेल्या काही तक्रारी पुढीलप्रमाणे आहेत ज्या आजतागायत अजूनही चालू स्थितीत आहेत आणि त्याचा कोणताही आढावा अद्यापही महावितरनकडून घेण्यात आला नाही. तक्ररीबाबत कोणत्याही प्रकारचा फोन, ईमेल किवा घरी येऊन विचारणा एकदाही करण्यात आली नाही आणि वीज तोडणी साठी अधिकारी वर्ग अगदी पुढे पुढे होता. तक्रार अजुन देखील चालू स्तिथित आहेत त्या पुढीलप्रमाणे: ०००००१००७०१८७, ०००००१००७०२०४, ०००००१००७०२२५, ०००००१००७०२२७, ०००००१२५१९९७६ आहेत. अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत जाऊन मी तक्रार निवारन करून घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण शेवटी महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे पदरी निराशाच पडली. महावितरण अधिकार्यांच्या दिरंगाई आणि नाकरतेपणामुळे त्यांनी अगदी शेवटचा उपाय म्हणून मला संपूर्ण थकबाकी व्याजासहित भरणा करण्यास सांगितले आणि आश्वासन दिले की सदोष मीटर च्या जागी नवीन मीटर बसवले जाईल आणि नवीन रीडिंग प्रमाणेच पुढील महिन्यापासून तुम्हाला सामान्य बिल येण्यास सुरूवात होईल. मी शेवटचा उपाय म्हणून दिनांक २७ ऑगस्ट २०१९ रोजी संपूर्ण थकबाकी १०७८० रुपये भरून दिनांक २८ ऑगस्ट २०१९ रोजी नवीन मीटर बसवून घेतले. नवीन मीटर (मीटर नंबर ४२५६७९६९) बसवताना मी संपूर्ण तपासणी करून घेतली व मीटर रीडिंग ० असल्याची खात्री देखील करून घेतली. दिनांक ०४ सप्टेंबर २०१९ रोजी मला महावितरण कडून एसएमएस आला की आज नवीन मीटर ची रीडिंग घेण्यात येईल. परंतु संपूर्ण दिवसभरात एकही कर्मचारी रीडिंग घेण्यासाठी आला नाही. यावरून हेच सिद्ध होते की कर्मचारी किती कामचुकार आणि निष्काळजी प्रकारचे आहेत. आणि ठरल्याप्रमाणे आज ०९ सप्टेंबेर २०१९ ला मला परत एकदा अनपेक्षित बिल आले जे परत एकदा मागील फॉल्टी मीटर च्या रीडिंग प्रमाणे अगदी तंतोतंत तेच होते. तोच जुना मीटर क्रमांक, तेच जुने रीडिंग, जुनेच बिल, सर्व काही जुने. आणि हो, मीटरचा किवा मीटर रीडिंग च्या फोटोचा कोणता लवलेश ही नव्हता वीज बिल मधे !!!

महोदय, शेवटी मलाच हेच विचारायचे आहे की सर्व काही जुन्या पद्धतीनेच भोंगळ कारभार करावयाचा होता तर मला आपण नवीन मीटर बसवायला सांगून काय सिद्ध केलेत???

आज स्थानिक महावितरण कार्यालयात याबाबत त्वरित विचारणा केल्यास मला त्यांच्या सिस्टम मधे नवीन मीटर डीटेल्स अपडेट झाले नसल्याचे असमाधानकारक उत्तर देण्यात आले. आणि आलेले फॉल्टी बिल पुन्हा मगीलप्रमाणेच भरण्यास सांगितले. हे उत्तर कितपत योग्य आणि समाधानकारक आहे तुम्हीच सांगा???

नवीन मीटर २८ ऑगस्ट २०१९ ला बसवले असताना देखील ०४ सप्टेंबर २०१९ रोजी महावितरण चा कर्मचारी नवीन मीटर रीडिंग घेण्यास का नाही आला???

जर कर्मचार्याने मीटर रीडिंग घेतली असेल तर तो ती कार्यालयात दाखवून का सिद्ध करत नाही? किवा नवीन वीज बिलवर मीटर चा फोटो का नाही???

महोदय, या वरील सर्व गोष्टींवरून हेच सिद्ध होत आहे की महावितरण संस्थेचा दिवा, ठाणे येथील कारभार हा अतिशय भोंगळ, अपारदर्शक, भ्रष्टाचारयुक्त असा आहे.
शेवटी मला इथे हेच नमूद करायचे आहे की येणार्‍या १० दिवसांच्या कालावधीमध्ये मला ह्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे द्या आणि नवीन मीटर प्रमाणेच बिल सुधारित करून द्या. ह्यावेळेस देखील असमाधानकारक उत्तर मिळाल्यास मी प्रशासनापर्यंत महावितरणाचा गोंधळ कारभार उघड करण्यास गय करणार नाही.

शेवटी मला इथे हेच नमूद करावेसे वाटते की सामान्य माणसाची जास्त परीक्षा नका पाहू. ग्राहकांचे समाधान हेच तुमचे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे. त्यांना न्याय मिळवून देण्याची अंतिम आणि सर्वस्व तुमची जबाबदारी नव्हेच तर कर्तव्यदेखील आहे !

तुमचाच ग्राहक,
तानाजी रामचंद्र पोकलेकर

ग्राहक क्रमांक: ०००४६७१३५५६२
बिलिंग यूनिट: ४६४३
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Mahadiscom / MSEB / MSEDCL customer support has been notified about the posted complaint.
Complaint comments 

Comments

Service cable short circite hua hai..new cable connection krna hai
[protected] Complaint - High Bill
we just shifted to our new flat and I received the bill for previous months for 2000+ even though nobody was staying there, This is unacceptable.

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Mahadiscom / MSEB / MSEDCL
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    12%
    Complaints
    4130
    Pending
    0
    Resolved
    504
    Mahadiscom / MSEB / MSEDCL Phone
    +91 22 2261 9100
    +91 22 2261 9300
    Mahadiscom / MSEB / MSEDCL Address
    Hongkong Bank Building, M.G. Road, Fort, Mumbai, Maharashtra, India - 400001
    View all Mahadiscom / MSEB / MSEDCL contact information