Maharashtra State Road Transport Corporation [Msrtc] — Indecent behavior by lady conductor with my daughter

प्रति,
माननीय आगारप्रमुख,
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,
सांगली आगार, सांगली
अर्जदार सत्यजित शाम शेगुणशी
राहणार वालचंद कॉलेजच्या पूर्वेस, कृषी कॉलेजच्या समोर, विश्रामबाग, सांगली
विषय शिवशाही बस नंबर MH09EM1380 या बसच्या कंडक्टर व ड्रायव्हर विरुद्ध कारवाई होणे बाबत.
महोदय,
काल दिनांक 26/03/2024 रोजी माझी मुलगी संस्कृती ही पुण्यातून सांगलीकडे येण्याकरता शिवशाही गाडी नंबर MH09EM1380 मध्ये बसलेली होती. सदरची गाडी नेहमी अधिकृतपणे राजवाडा चौकातून जाते व त्या ठिकाणी नेहमी थांबते. त्यामुळे मी राजवाडा चौकात आयसीआयसीआय बँकेजवळ बसची वाट बघत थांबलेलो होतो. तथापि सदरची बस अधिकृत ठरलेल्या मार्गाने न येता बुरुड गल्लीतून रॉंग साईडने एकेरी मार्गाचा भंग करून मैत्रीण दुकानच्या कॉर्नर वरून महापालिकेकडून स्टॅन्ड कडे गेली. त्या दरम्यान मी माझ्या मुलीच्या संपर्कात होतो. बुरुड गल्लीतून बस जाताना मुलीने वडील राजवाडा चौकात थांबलेले आहेत असे महिला कंडक्टरला सांगितले असता त्या महिला कंडक्टरने बस राजवाडा चौकात जाणार नाही, पोलीस स्टेशन जवळ थांबेल असे सांगितल्यामुळे आणि बसचा मार्ग बदललेला असल्यामुळे मी मैत्रीण दुकानाच्या आधीपासून बसच्या मागे जाऊ लागलो. मुलगी वारंवार कंडक्टरना "वडील गाडीच्या मागणी येत आहेत, बस थांबवा" अशी विनंती करत होती. तथापि त्या महिला कंडक्टरने बस थांबवणार नाही असे स्पष्ट सांगितले व तरुण भारत च्या जवळ गाडी थांबवली. मी माझ्या मुलीला माझ्या गाडीवर घेऊन बसच्या पाठीमागून स्टैंड वरती गेलो व त्या महिला कंडक्टरला "तुम्ही महिला असून देखील एका महिलेला / मुलीला सहकार्य केलेले नाही, मी तुमच्याविरुद्ध वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे, तुमचे नाव सांगा" असे म्हटल्यानंतर त्यांनी मोबाईल काढून शूटिंग करण्यास सुरुवात केली व तुम्ही माझी लाज काढता असे खोटे आरोप करून मोठमोठ्या आवाजात बोलायला सुरुवात केली. मी देखील त्या महिला कंडक्टरचे असभ्य वर्तन माझ्या मोबाईल वरती चित्रित केलेले आहे. एसटी महामंडळ कडून रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सोयी करता बस थांबवता येईल असे किंवा थांबत जावा असे डायरेक्शन्स आहेत असे सांगून तुम्ही मुलगी विनंती करत असताना देखील बस थांबवलेली नाही, हेच मी त्यांना वारंवार सांगत होतो. एकंदरीत पाहता त्या अतिशय तापट स्वभावाच्या असल्यामुळे उद्धट भाषेत बोलत होत्या. तसेच तेथील सिक्युरिटी गार्डने देखील तुमची तक्रार असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करा अशी भाषा वापरून हातवारे केले. तसेच शेवटपर्यंत त्या महिला कंडक्टरने स्वतःचे नाव सांगितले नाही. यावरूनच त्यांचा बेजबाबदारपणा दिसून येतो. प्रत्येक वेळेस माझी मुलगी शिवशाहीने पुण्यातून सांगलीत येते. राजवाडा चौकात नेहमी बस थांबते किंबहुना तेथे माझ्या माहितीनुसार अधिकृत स्टॉप आहे. असे असताना एकेरी मार्गाचा भंग करून बसच्या ड्रायव्हरने चुकीच्या मार्गाने बस चालवून कायद्याचा देखील भंग केलेला आहे. तसेच प्रवाशांची सोय बघण्याच्या दृष्टिकोनातून एक मुलगी रात्रीच्या वेळी विनंती करत असताना देखील तिच्या सोयीनुसार किंबहुना अधिकृत बस स्टॉप वरती बस न घेऊन जाता व न थांबवता कंडक्टरने कर्तव्यात कसूर केलेली आहे. याकरता त्यांच्यावरती कारवाई होणे आवश्यक आहे.
म्हणून दिला तक्रारी अर्ज.
सांगली
दि. 27/03/2024 अर्जदार
Was this information helpful?
No (0)
Yes (1)
Mar 27, 2024
Updated by Satya2589
सदरची बस पुण्यातून स्वारगेट येथून संध्याकाळी सात वाजता सुटलेली होती व रात्री साडेबाराच्या दरम्यान सांगली आगाराच्या बस स्टॅन्ड मध्ये आलेली होती
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC]
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    8%
    Complaints
    2423
    Pending
    0
    Resolved
    183
    Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC] Phone
    +91 20 2612 6218
    +91 20 2612 2591
    Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC] Address
    Pune Station, Pune, India - 411001
    View all Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC] contact information