Mhada — Ceiling leaking since 10 years

Vilas Shenoy
102, Satyam
B M Marg
Prabhadevi station road west
Mumbai 400013
03/09/20

विषय :- सिलींग मधून वर्षोन वर्षे होत असलेल्या पाण्याच्या गळती बाबात...
संदर्भ :- १. दि. १०.०३.२०१० चे पत्र ...
२. आपले जा. क्र. / का. अ./ ग (द)/५४५/ २०१० दि. १७.०३.२०१०
३. माझे दि. २६.०७.२०१० रोजीचे माहितीच्या अधिकारात माहिती मागविल्याचे पत्र.
४. आपण वरील संदर्भातील पत्राला दिलेले उत्तर - जा क्र/३ मु अ/मि व्य २/(पु गा ) दु. व पु ४६२५ दि. १३.१२.२०१०

महोदय,
वरील संदर्भातील पत्रांच्या विषयानुषंगाने मी छतामधुन (सिलींग) २०२ च्या घरातून होत असलेल्या गळती बाबत आपणास कळविलेले आहे. सदर बाब घर क्र. २०२ च्या घर मालकास देखील वारंवार तोंडी (विनंती म्हणूनही ) कळविली आहे. सदर तक्रार त्यांच्या कानी घालताच महिना दिड महिना गळती थांबते व त्या नंतर "येरे मा झ्या मागल्या" या उक्ती प्रमाणे पुन्हा पूर्वी प्रमाणे गळतीला सुरूवात होते.

मी दि. १०.०३.२०१०चे पत्रास अनुसरून (परिशिष्ट : १)
आपण त्वरेने दि. १७.०३.२०१० रोजी सदनिका रहिवासी भाडेकरूनां सविस्तर पत्र (परिशिष्ट : २) लिहून समज देवून कळविले आहे.
तद् नंतर दि २६.०७.२०१० च्या पत्रानुसार (परिशिष्ट :३) मी पुनर् विनंती अर्ज केला.
या अर्जास आपण दि. २२.११.२०१० रोजी च्या पत्रानुसार सदर पाठपुरावा व कार्यवाही ही कार्यकारी अभियंता - ग (दक्षिण ) विभागा मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ - परळ मुंबई १२ येथे करण्यास सांगितले म्हणून सदर विनंती अर्ज आपल्या कार्यालयात करीत आहे.

गेली १० वर्षे छता मधून पाणी गळून गळून छताच्या शिगा सडल्या /गंजल्या आहेत व छताला बाक आला आहे...
तसेच घर क्र. २०२ मधिल रहिवाश्यांनी घरात ष्ट्रक्चरल बदल केलेले आहेत.
१. यामुळे छत कोसळेल कि काय याची भिती वाटतेला.
२. कदाचित शाॕर्ट सर्किट मुळे आग लागू शकते किंवा जिवीत हानी संभवते.
३. सदर ष्ट्रक्चरल बदलामुळे संपूर्ण ईमारतीस धोका संभवतो.
मी स्वताः ज्येष्ठ नागरिक असून सदर घरात एकटाच राहातो आहे. वरिल सर्व अडचणींमुळे माझी फारच धावपळ होते व मला मानसीक त्रास देखिल होतो व असाह्यता जाणवते.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    India
    File a Complaint