मा. ट्राफिक पोलिस अधिकारी,
मुंबई.
माझी गाडी क्र. MH 03 AW 1025 मुलुंड (पूर्व), संभाजी ग्राउंड, दिनदयाल नगर येथे दि.5/3/21 रोजी रस्त्याच्या बाजुला उभी करण्यात आली होती व मी याच ग्राउंडमध्ये वॉक करत होतो, येथे दिवस-रात्र 2 व 4 चाकी गाड्या नेहमीच उभ्या असतात, तसेच येथे कुठेही नो पार्किंगचा बोर्ड लिहिलेला नाही. आम्ही नेहमी या ठिकाणी गाडी पार्किंग करतो व मैदानात वॉक करतो, परंतू याच दिवशी माझ्या गाडीचा फोटो काढून मला रू.200/- फ़ाइन भरण्याबाबत मेसेज पाठविण्यात आला. हे योग्य आहे का?
तेव्हा आपणास विनंती करण्यात येते की, वरिल बाबतीत आपण मला योग्य तो न्याय द्यावा.
धन्यवाद !
आपला कृपाभिलाषी,
राजेंद्र गावडे Was this information helpful? |
Post your Comment