मी किशोर खाटीकमरे. ज्ञानदीप कॉलनी दगडू पाटील नगर, थेरगाव, पुणे - ४११०३३
मी या आधी सुद्धा तक्रार करून अजूनही तक्रारींचे निरसन झालेले नाही. आमचा इथे रोज चेम्बर चोकअप होतात आणि त्याच सर्व पाणी नागरिकांचा घरामध्ये घुसते, याचा त्रास म्हणजे कॉलोनीतील तसेच परिसरातील नागरिकांना मलेरिया, टाईफ़एड, या सारख्या वेगवेगळ्या आजाराने त्रासले आहे.
चेम्बर चोकअप होऊन त्याचे सर्व पाणी रस्त्यावरती साचून साचून अक्षरशः डबक्या सारखे दिसते.
तसेच याचा सर्व त्रास रोजच्या पिण्याच्या पाण्यावरती सुद्धा होत आहे.
वेळोवेळी तक्रार करून सुद्धा कोणी इथे लक्ष देत नाही. कृपा करून या कडे लक्ष द्यावे हि विनंती.
सोबत: फोटो आणि विडिओ Was this information helpful? |
Post your Comment