| Address: sanjay nagar galli no 2 mukundwadi, Aurangabad, Maharashtra, 431001 |
प्रति,
आयुक्त श्री. निपुण विनायक,
महानगर पालिका, महानगर पालिका भवन,
औरंगाबाद ४३१००१.
विषय : ड्रेनेज लाईन दुरूस्ती अथवा नवीन ड्रेनेज लाईन करणेबाबत.
अर्जदार : त्रस्त समस्त गल्ली नं २, संजयनगर मुकुंदवाडी, वार्ड क्र, ८४.
महोदय,
वरील विषयी विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की, आम्ही सर्व गल्ली नं, २, येथे २० वर्ष जुनी ही ड्रेनेज लाईन वारंवार तक्रार देऊन देखील कोणीही ही गोष्ट काही मनावर घेत नाही या मुले सर्व ड्रेनेज लाइन चे पाणी हे संपूर्ण गल्लीमधून वाहू लागले, त्यामुळे दुर्गंधी आणि रोगराई पसरू लागली. आणि हे सर्व पानी पिण्याचा पण्य मध्ये मिसळु लागले, या मुले आम्हा सर्व नागरिकांचे या ठिकानी राहणे खूप कठीण झाले आहे.
तुम्ही जर महानगर पालिका चे ड्रेनेज लाइन तक्रार वही बघितली, तर साहेब त्या मध्ये सर्वात जास्त आमच्या या नागरिकांच्या समस्या आहेत. आम्ही किती दिवस हा त्रास सहन करायचा वारंवार आम्ही आपल्या नगरसेवक, वार्ड अधिकारी यांना सांगून देखील यांनी आमची ही समस्या काही सोडवली नाही.
या सर्व कारणामुळे दुर्गंधी व रोगराई पसरून समस्त रहिवास्यांचे आरोग्य हे धोक्यात आले आहे
तरी वरील विषयी आपण लवकरात लवकर लक्ष देऊन ही समस्या कायम स्वरूपी सोडवावी ही विनती.
Ask us for bribe