Bajaj Finserv — recovery procedure of bajaj finserv

Address:411038

मी बजाज फिन्सरव या फिनान्स कंपनी कडून कर्ज घेतले माझ्या घरावर. तेरा महिने हप्ते नियमित देत आलो. चौदाव्या महिन्यात मला हफ्ता भरणे शक्य नाही झाले तर या एका हफ्त्या साठी बजाज फिन्सरव मधून मला दिवसातून वेगवेगळ्या नंबर वरून कमीत कमी पाच ते सात फोने यायला लागले. मी हा एक हफ्ता नाही भरू शकत आहे हे कळल्यावर तर हे फोने धमकीचे व्हायला लागले. बजाज फिन्सरव चा एक माणूस घरात येऊन बसायला लागला. मला फोने वर शिव्या देणे वाईट साईट बोलणे घरातल्या वस्तू विका किंवा डाग दागिने विका पण हफ्ता लगेच भरा असे बजाज फिन्सरव ची माणसे बोलू लागली. एक सात ते आठ दिवस मी तरीही हफ्ता नाही भरू शकलो तर मग मला त्यांच्या वाकडेवाडी येथील ऑफिस ला बोलावले, तिथे केबिन मध्ये तीन माणसांनी मला घेरून पैसे आताच मागावा नाहीतर घरातल्या सगळ्यांना असेच इथे बसवून ठेवू अशी धमकी देत दीड तास त्या केबिन मध्ये बसवून ठेवले. बार मी हफ्ता भरतो पण वेळ लागेल थोडा म्हटल्यावर घर लगेच रिकामे करा आणि हफ्ता भरेपर्यंत घराची चावी आमच्याकडे जमा करा अशी धमकी बजाज फिन्सरव च्या माणसांनी दिली. खूप विनवण्या केल्यावर त्यांचा एक माणूस माझ्या बरोबर माझ्या घरीच बसून राहिला. शेवटी खूप प्रयत्न करून ओळखीच्या माणसांकडून उसने घेऊन मी पैसे दिले तेव्हा बजाज फिन्सरव चा माणूस घरातून गेला.
मला प्रश्न पडलाय कि एवढे अधिकार खरंच या बजाज फिन्सरव ला दिलेत का आपल्या गव्हर्नमेंट नि? आणि जर हीच पद्धत आहे वसुलीची अगदी एकच हफ्ता राहिला तरी तर जसे शेतकरी आत्महत्या करतात तसे लवकरच कर्ज घेतलेले ग्राहक पण करायला लागतील.
आता माझ्या मित्रानो तुम्हीच ठरवा गोड गोड बोलून कर्ज देणाऱ्या बजाज फिन्सरव कडून कर्ज घ्यावे का कारण कर्जाच्या कालावधीत कधीतरी अशी वेळ येऊ शकते जेव्हा एखादा तरी हफ्ता राहून जातो ज्यावेळेला बजाज फिन्सरव ची माणसे तुम्हाला मरण यातना काय असतात हे नक्कीच जाणवून देतील तर खूप विचार करा आणि जमलेच तर यांच्या कचाट्यात सापडू नका.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Bajaj Finserv customer support has been notified about the posted complaint.
Complaint comments 

Comments

Hi,
I'm Hari Prakash Joshi,
24th May2018 mil mene 4999 rs Elite card ke liye online transfer kiya tha but aaj 28 July tak bhi bajaj finserv ne mujhe elite card nahi diya or nahi usse jude huye offers.
Mujhe mera pesa refund kare ya Elite card with offers den.
Anytha me nyaypalika ka sahara lunga.

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Bajaj Finserv
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    31%
    Complaints
    6835
    Pending
    0
    Resolved
    2026
    Bajaj Finserv Address
    4th Floor, 271 Business Park, Model Industrial Estate, Goregaon East, Mumbai, Maharashtra, India - 400063
    View all Bajaj Finserv contact information