Address: | Thane, Maharashtra, 421201 |
हा गंभीर विषय
गावांमध्ये बांधकाम करायचे असेल तर, बांधकामधारकाने एमएमआरडीएची परवानगी घेणे आवश्यक आहे .कोणतेही प्राधिकरण गावांमधील विकासावर नियंत्रण ठेवू शकले नाही.येथे कोणीही साहेब नियमित येत नाहीत.त्यामुळे येथे अर्ज देऊन शकत नाही.
अनधिकृत बांधकामांचे रक्षण करण्याचीच यंत्रणा एमएमआरडीएने उभी केली आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होतो.गेल्या वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अखत्यारीत नंदीवली गावांचा कारभार आहे.परंतु एकही बेकायदा बांधकाम वर्षभरात थांबलेले नाही याऊलट येत्या काळात नगरपालिका होणार असल्याने आपण करीत असलेली सर्व बेकायदा बांधकामे अधिकृत होतील, असा विचार करून माफिया, गावगुंडांनी इमले उभारण्याचा वेग वाढविला आहे.अशा पद्धतीने बेकायदा बांधकामे उभी राहून त्यांची विक्री होत आहे, हे एमआयडीसी, पालिका, पोलीस, एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना माहिती असूनही कधीही कोणत्याच यंत्रणेने ही बांधकामे रोखण्यासाठी कधी पावले टाकली नाहीत.यावरून माफिया किती शिरजोर झाले आहेत आणि त्यांच्यापुढे एमआयडीसी, एमएमआरडीए, कल्याण-डोंबिवली पालिका आणि पोलीस ही व्यवस्था कशी लुळीपांगळी पडली आहे, हे दिसून येत आहे. Was this information helpful? |
Post your Comment