Lokmat — Poor family suffering due to fraud news by a rich family in town (Mr. Goutam bhaleraos sister) having more power and political contacts

Address:431514

दुसरा विवाह करणार्‍या
पतीविरुद्ध गुन्हा दाखल

गंगाखेड : पहिली पत्नी हयात असताना अल्पवयीन मुलीबरोबर दुसरा विवाह करणार्‍या पतीविरुद्ध गंगाखेड पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरमध्ये राहणार्‍या नम्रता कपिल प्रधान (२७) या विवाहितेचा विवाह २६ एप्रिल २00९ रोजी कपिल प्रधान याच्यासोबत झाला होता. परंतु कालांतराने सासरच्या मंडळीने पैशांची मागणी करीत नम्रता यांचा छळ सुरू केला. याप्रकरणी २0१३ मध्ये नम्रता प्रधान यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद झाला होता.
हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना सासरकडील मंडळीनी पती कपिल प्रधान याचा २९ सप्टेंबर २0१५रोजी दुसरा विवाह लावून दिला. त्यानंतर नम्रता प्रधान यांनी या विवाहाची संपूर्ण माहिती घेऊन ३ फेब्रुवारी रोजी गंगाखेड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. फिर्यादीत पहिली पत्नी हयात असताना अल्पवयीन मुलीसमवेत दुसरा विवाह लावून दिल्याचे म्हटले आहे. या तक्रारीवरुन धोंडिराम प्रधान, सत्यभामा प्रधान, प्रियंका प्रधान, अश्‍विनी रणखांब, केवलाबाईमस्के, मिलिंद मस्के, गौळणबाई हनवते, अभिजित मस्के, उर्मिला मस्के, नामदेव हनवते व रत्नमालाबाई वाकळे यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड करीत आहेत. /(प्रतिनिधी)...

THIS IS NOT VERIFIED BEFORE PUBLISHING IN NEWS PAPER
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Gangakhed, Maharashtra I
    India
    File a Complaint