Address: | Left Bhusari Colony, Kothrud, Pune |
निळकंठ सोसायटी जवळ सध्या चांदणी चौक हायवेचे काम सुरू आहे तेथे रोलरने सपाटीकरण सुरू आहे सदर रोलर हा दिवस रात्र कधीही सुरू केला जातो शेजारील सोसायटीतील लोकांचा काहीही विचार न करता रात्री बारा एक वाजता सकाळी पाच सहा वाजता कधीही काम सुरू केले जाते सदर काम करीत असताना निळकंठ सोसायटी पूर्णपणे हादरून जाते जणू भूकंपाचे धक्केच बसत आहेत
वास्तविक पाहता डीपी नुसार सदर इमारत ही बाधित होत होती परंतु प्रशासनाने जाणून-बुजून सदर इमारत बाजूला ठेवून काम सुरू केले आहे यापुढे सदर इमारतीला तडे जाण्याची शक्यता आहेतरी प्रशासनाने सदर बाबीचा गांभीर्याने विचार करावा व निळकंठ सोसायटीजवळील काम त्वरित थांबवावे ही विनंती
Was this information helpful? |
Post your Comment