दि 12/12/2016 रोजी पारोळा ते पनवेल प्रवास करण्यासाठी रेडबस चे ऑनलाईन बुकिंग केले, श्री दुर्गा ट्रॅव्हक्स चे l10 व l 15 हे सीट बुक होते. रेड बस च्या टेक्स्ट मेसेज नुसार दिलेला बस नंबर आणि प्रत्यक्ष आलेली बस यात ताळमेळ नव्हता शिवाय ही बस तासभर लेट आली आणि जेथून पिकअप होते तेथून न घेता अर्धा किलोमीटर पुढे बोलावून बस मध्ये घेतले. जे l10 नं चे सीट बुक होते त्यावर दुसराच प्रवासी झोपलेला होता, म्हणून बस कंडक्टर ने वेगळे सीट दिले त्यावर प्रवास केला. पनवेल या पोहचण्याच्या ठिकाणी बस 2 तास उशिरा पोहचली त्यामुळे ड्युटीवर जाता आले नाही. L 15 हे दुसरे सीट आईसाठी बुक केले होते त्या सीट च्या शेजारील पॅसेज मध्ये तात्पुरते सीट तयार करून एका प्रवाशाला झोपायला दिले होते, त्याचा त्रास आईला होऊ नये म्हणून मी त्याठिकाणी गेलो व मला दिलेल्या सीट वर आईला बसवले. रेडबस चे एका सीट साठी 711 प्रमाणे 2 सीट ऑनलाईन बुक केले याचा पश्चाताप वाटला. एकंदरीत सेवा पुरवठादार श्री दुर्गा ट्रॅव्हल्स आणि ट्रॅव्हल एजंट रेडबस यांच्या संगनमताने प्रवाशांची लूट होत असावी असा संशय बळावला.
संजय पाटील, पनवेल.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Red Bus customer support has been notified about the posted complaint.
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Post your Comment