महोदय,
वरील वीषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, मी ब्लूटूथ स्पीकर दिनांक 18.9.2020 ला फलीपकार्ट हया ऑनलाईन वेबसाईटवरून विकत घेतला आहे. परंतू ब्लूटूथ स्पीकरची ऑन/ऑफ बटन काम करीत नाही. करीता ब्लूटूथ स्पीकर दुरूस्त करण्याकरीता बोट कंपनीचे सर्वीस सेटर F1 Info Solution, FS – 019, 1st Floor, Keshav Imperial, Malviya Road, Near Shani Mandir, Sitabuldi, Nagpur, Maharashtra, Pin: 440012 येथे सूरूवातीला गेलो असता त्यांनी मला सांगीतले की ब्लूटूथ स्पीकर दुरस्त करून मिळणार नाही तर ते रीपलेस करून मीळेल, सध्या ते आमच्याकडे उपलब्ध नाही तरी तुम्हाला आम्ही फोन करू अथवा तुम्ही 5 दिवसांनी या ब्लूटूथ स्पीकर उपलब्ध झाल्यावर तुम्हाला रीपलेस करून मीळेल अशाप्रकारे मी मागील 1 महीण्यापासून जात आहे, परंतू अजूनपर्यंत त्यांनी रीपलेस करून दिलेले नाही.
करीता आपणास विनंती आहे की, तुम्ही आपले प्रतीनीधी मार्फत स्पीकर दुरस्त अथवा रीपलेस करून देण्याची कृपा करावी. सोबत इनव्हाईसची कॉपी जोडण्यात आलेली आहे.
वरील सर्वीस सेंटरच्या कर्मचा-यांची वर्तणूक चांगली नाही, वेळेवर उपलब्ध राहत नाही तसेच कस्टमरला विनाकारण त्रास देतात आणि एकंदरीत सर्वीस सेंटरची सर्वीस चांगली नाही. अशाप्रकारे बोट कंपनीची बदनामी होते. करीता आपणास विनंती आहे वरील सर्वीस सेंटरची सेवा तात्काळ बंद करण्याची कृपा करावी.
धन्यवाद !
model no. stone grenade, 5w
Was this information helpful? |
Post your Comment