[Resolved] Croma — service not available after warranty | |||
मी दिनांक २५.०७.२०१७ रोजी croma सेंचुरी भवन, प्रभादेवी येथून croma power bank 10400mah, model no. Crca0065 खरेदी केली होती. ती खरेदी करते वेळेस तेथील customer executive ने असे सांगितले होते कि इतर कंपन्यांच्या तुलनेनी हि power bank चांगली आहे भविष्यात तुम्हाला या power bank मध्ये कोणताही प्रॉब्लेम आला तर तुम्ही ते product घेऊन आमच्याकडे या तुम्हाला ते व्यवस्थित करून देण्यात येईल. सदर power बँक ला दोन usb port असून त्या पैकी एक usb port आत गेले आहे व त्यामुळे त्या usb port चा वापर बंद झाला आहे. या संदर्भात आज दिनांक १७.०३.२०१८ रोजी मी croma सेंचुरी भवन, प्रभादेवी येथे miss snehal thakur ज्या तेथे customer service desk या पदावर काम करत आहेत त्यांना भेटलो असून त्यांना हा प्रॉब्लेम सांगितला तर त्यांच्याकडून असे सांगण्यात आले की सदर power bank ची warranty ६ महिन्याची असून ती संपलेली आहे व physical damage असल्याने ते repair होणार नाही. मी त्यांना विनंती केली की त्याची warranty संपली आहे हे मला मान्य आहे परंतु हे तुमच्या कंपनीचे प्रॉडक्ट आहे आणि ते तुम्ही मला रिपेअर करून द्या त्याची रक्कम भरण्यास मी तयार आहे. परंतु त्या म्हणाल्या की warranty मध्ये असेल तरच आम्ही ते replace करून देतो, त्यात repair होत नाही. सदर प्रकरणी mr saurabh uppal, asstt store manager यांना भेटलो असता त्यांच्याकडून हि हेच उत्तर मिळाले. मी त्यांना विचारले असता की जर दुसरे usb port खराब झाले तर आम्ही हि power bank फेकून द्यायची का? तर त्यांचं उत्तर असे होते की त्यात आम्ही काही करू शकत नाही. मी या कंपनीला असे सांगू इच्छितो की जर एखादे प्रॉडक्ट कंपनी repair करू शकत नसेल आणि तुम्ही ग्राहकाला अशीच सर्विस देणार असाल तर तसे प्रॉडक्ट कंपनीने बनवू सुद्धा नये व ग्राहकांची फसवणूक करू नये. Was this information helpful? | |||
Aug 13, 2021 Complaint marked as Resolved Croma customer support has been notified about the posted complaint. Verified Support Apr 27, 2020 Croma Customer Care's response Hi, I trust your issue has been resolved. If not, then we request you to reach out to our customer care team on [protected] or write an email at [protected]@croma.com. They will assist you with the resolution of your concerns.
| |||
Add a Comment | |||
74%
Complaints
3217
Pending
466
Resolved
2225
View all 3217 Croma reviews & complaints
+91 22 6761 3600 [Support Office]
+91 72 0766 6000 [Helpline]
+91 40 6722 6870 [International Helpline]
Unit no.201, 2nd Floor, Akruti Center Point, MIDC, Andheri East, Mumbai, Maharashtra, India - 400093
View all Croma contact information
Post your Comment