Hero Motocorp — Hero Duet _ Engine issue

Address:Swargate, Pune

मी इनायत काझी या अर्जद्वारे आपल्या निर्दशनास आणीत आहे मी सदर स्कूटर मे २०१६ ला खरीदी केली आहे. आपल्या चांगल्या सेवेचा लाभ मला मिळावा म्हणून मी HERO GOODLIFE आणि HERO JOYRIDE ह्या मेम्बरशिप मध्ये सामील झालो. कारण मला आपल्या चांगल्या सेवेचा आणि माझ्या फायद्याचा विचार होता.


दिनांक ९ ऑक्टोबर २०१७ ला बॅटरी व्यवस्थित काम करत नव्हती. त्यावेळी १२-१०-२०१७ ला तक्रारपत्र देऊन नवीन बॅटरी लावून घेतली. त्यानंतर २०१८ सालामध्ये आपल्या JOB CARD मध्ये गाडी मध्ये आवाज येत आहे हि तक्रार दिली होती. त्यामुळे इंजिन ही लवकर गरम होत होती हे निदर्शनास आणले. परंतु सदर तक्रार बऱ्याच वेळा चालू राहिली. कधी तुमच्या कडून सांगण्यात आले की GEAR BOX मध्ये आवाज आहे, कधी तुम्ही सांगितले की हळू हळू आवाज कमी होईल. माझ्या बऱ्याच वेळा सर्विसिंग करताना आपल्या JOB CARD मध्ये ह्याची तक्रार दिली. सर्विसिंग नंतर कधी आवाज थोडा कमी व्हायचा परंतु पुन्हा आवाज सुरु व्हायचा आणि इंजिन गरम व्हायचे. बऱ्याच सर्विसिंग नंतर आवाज येत राहीला शेवटी मी २५ मार्च २०२२ ला सर्विसिंग ला गाडी देताना आग्रह धरला की आपण मेहेरबानी करून इंजिन उघडून पाहा. त्यावेळी तुमच्या कडून इंजिन रिपेरिंग चे काम सुरु झाले. दर तीन चार दिवसांनी मी आपल्या कर्मचाऱ्यांना फोन करून माहिती घेत होतो. बऱ्याच वेळा तुमचा कर्मचारी फोनच रिसिव्ह करायचा नाही. मग बिलिंग डिपार्टमेंट मध्ये फोन करून त्यांना बोलवून घायचो. त्यावेळेस तो सांगायचा की पार्ट बाहेरुन मागवायची ऑर्डर दिली आहे अजून आलेला नाही. मी फॉलोअप घेतो. परंतु त्याने मला कधीच फोन वरून माहिती दिली नाही. सारखा मीच फोन करायचो. दोनदा प्रसाद लांजेकर ना फोन लावला त्यांना सदर गोष्टीची कल्पना दिली. त्यांनी मला गाडीचे काम त्वरीत करून डिलिव्हरी देतो म्हणाले. मग मी १५ एप्रिल २०२२ शुक्रवारी श्री प्रसाद लांजेकर यांना सकाळी १०/१०:३० ला फोन केला. त्यांनी गाडी संध्याकाळी देतो म्हणून सांगितले.

१५ एप्रिलला ही गाडी नाही मिळाली. मग सोमवारी १८ एप्रिल ला सकाळी शमशेर सिंग ला फोन केला. नेहमी प्रमाणे त्याने फोन घेतला नाही. मग श्री लांजेकर ना फोन लावला. त्यांनी सांगितले की तुमची गाडी तयार आहे. उद्या १९ एप्रिल ला गाडी घेऊन जा. परंतु बिलिंग झाले नव्हते मग श्री लांजेकरना फोन केला त्यांना सांगितले की बिल चा मेसेज आलेला नाही. साधारण १ वाजे पर्यंत मेसेज आला आणि बिलाची ७६३४/ आली.

यावर माझी अशी तक्रार आहे की या प्रकरणात मला फारच मनस्ताप सहन करावा लागला आहे. माझ्या पूर्वी पासून च्या तक्रारही दखल घेण्यात आली नाही. वेळोवेळी सर्विसिंग ला गाडी देताना सदर तक्राराची पुनरावृत्ती व्हायची परंतु त्याचे निरसन नाही व्हायचे. शेवटी २५ मार्च २०२२ ला गाडी देताना इंजिन उघडा म्हणून स्पष्टपणे सांगितले कारण मला भीती होती की एंजिनचे जास्त नुकसान होऊ नये. फ्रंटलाईन सुपरवायझरला दर तीन चार दिवसांनी फोन करायचो परंतु ते क्वचित फोन उचलायचे.

त्यांच्या कामाची पद्धत मला आवडली नाही. तब्बल २४ दिवसांनी गाडी चे काम पूर्ण झाले. ह्या २४ दिवसात मला बराच मनस्ताप झाला. इंजिनच्या कामाला २४ दिवस खरेच लागतात कां? आणि हे जे बिल ७६३४/ झाले आहे त्याच्याशी मी सहमत नाही. जर वेळेत ह्या गोष्टीकडे लक्ष देता आले असते तर नाहक एवढा भूर्दंड झाला नसता. म्हणून आपणास विनंती आहे की आपण सदर बिलामध्ये मला सूट द्यावी.

हे बिल मी भरू शकत नाही.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Hero MotoCorp customer support has been notified about the posted complaint.
Apr 21, 2022
Updated by inayatkazi
Hi Amol & team,

I am summarizing the points here for better understanding.

Upon visiting the workshop to submit the complaint letter on 19th April ’22, Mr. Lanjekar simply asserted that the warranty period was over although I had been complaining of the same issue since the year 2018. Is it that they were waiting for the warranty period to expire? Moreover, Mr. Anikesh Mehta (Dealer – Lakshya Motors, Swargate, Pune) informed me that INR 50 will be charged each day until the scooter is at the workshop. I was shocked at this attitude!

You made me wait for 25 days to fix the problem (because the engine part wasn’t available) & when I genuinely had an issue with the way the entire matter was being handled, you cannot wait for 2-3 days until the issue is settled? How inconsiderate can service providers be?

I was also told that the dealer was different while I purchased the scooter & hence the current dealer isn’t responsible. So are you trying to imply that the customer must suffer because of a change in dealership? We considered Hero MotoCorp, which is among the top brands in the country today, while purchasing the scooter & not the dealer. Is this how dealers deal with customers?

Please treat this grievance as a matter o[censored]rgency. With each passing day, we are forced to pay 50 INR as a penalty. Nevertheless, I am already extremely disappointed & frustrated to see how this entire episode has shaped up!

Kindly look into this asap.

Regards,

Inayat Kazi
Complaint comments 

Comments

Dear Sir,

Sorry to hear about the trouble you faced. We request you to provide your Registered Mobile Number / VIN (Vehicle identification number) and Dealer details on app.[protected]@heromotocorp.com to help us in resolving your issue.

Regards,
Team Hero MotoCorp

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Hero MotoCorp
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    4%
    Complaints
    6252
    Pending
    0
    Resolved
    257
    Hero MotoCorp Phone
    +91 11 2614 2451
    +91 11 2614 4121
    Hero MotoCorp Address
    34, Community Centre, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi, Delhi, India - 110057
    View all Hero MotoCorp contact information