Msedcl — High electricity bill due to faulty meter not resolved since months even after multiple complaints

Address: Karjat, Maharashtra
Website: wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getHome

आमचा फ्लॅट अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे दरमहा आमचे 0 युनिट खर्च होतात. परंतु सप्टेंबर 2024 पासून अचानक दरमहा 100 युनिट वापरले गेल्याचे दाखवत जास्तीचे बिल येत आहे.

ऑनलाईन तक्रार नोंदवली असता सदोष मीटर बदलून आगामी बिलिंग सायकल पासून मीटर रिडींग नुसार वीज बिल दिले जाईल असे आम्हाला इमेल द्वारे कळविण्यात आले.

तसेच मीटर मधील दोषामुळे आलेल्या जास्तीच्या बिलात मात्र कोणतीही सुधारणा केली जाणार नसल्याचे सांगून ऊर्जा बिल त्वरित भरण्याबाबतही सूचना करण्यात आली.

Your bill is not subjected to any revision and it is requested to pay the Energy Bill immediately.

Closure Remark : Faulty Meter Replaced & Electricity Bill Will Be Issued As Per Meter Reading From Upcoming Billing Cycle

त्यानुसार सप्टेंबर मध्ये वाढीव वीजबिल भरून तसेच याबाबत 4 वेळा ऑनलाईन तक्रार नोंदवल्यानंतरही समस्येचे निवारण झाले नाही.

त्यामुळे मग 13 डिसेंबर 2024 रोजी MSEDCLच्या कर्जत येथील कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन मीटर मधील दोषाचे निवारण लवकरात लवकर करण्याची विनंती केली असता आम्हाला 2 महिन्यांचे बिल 130 रुपये प्रति महिना यानुसार सुधारून देण्यात आले. ते बिल लगेच भरून लेखी तक्रारही कार्यालयात जमा केली असता, नवीन मीटर बसवून 24 तासात नवीन सुधारित बिल ऑनलाईन बघता येईल असे आम्हाला आश्वासन देण्यात आले.

तरीही 16 डिसेंबर रोजी रु. 2950 वीजबिल आले. तसेच 24 डिसेंबर 2024 रोजी वीजबिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याबाबत खालील मेसेजही आला.

Disconnection notice was issued for Cons ***** of Rs.1760 on dt.10-12-24. Notice period is up to 25-12-24. Pay immediately. Ignore if already paid. MSEDCL

जानेवारी 2025 मध्ये आलेल्या बिलामध्येही पुन्हा डिसेंम्बर महिन्याचे 100 युनिट्स लावून रु3260 चे एकत्रित बिल पाठविण्यात आले आहे.

वेबसाईट वर बिलासोबत बघता येणारा मीटर रिडींग चा फोटो देखील उपलब्ध नाही.

2022 साली देखील आम्हाला मीटरमधील बिघाडामुळे असाच त्रास सहन करावा लागला होता. आणि अवघ्या २ वर्षांत त्याचीच पुनरावृत्ती होत आहे.

वारंवार ऑनलाईन तक्रार नोंदवूनही तसेच प्रत्यक्ष भेटून, वाढीव वीजबिल भरूनही आम्हाला सतत मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लवकरात लवकर या समस्येचे निराकरण करून सुधारित वीजबिल न पाठवल्यास आम्हाला नाईलाजाने रीतसर तक्रार नोंदवावी लागेल, असे MSEDCL ला सांगूनही काही उपयोग झाला नाही.

त्यामुळे कृपया वरील तक्रारीकडे लक्ष देऊन मीटर लवकरात लवकर दुरुस्त करावे, सुधारित वीजबिल पाठवावे तसेच सप्टेंबर मध्ये भरलेल्या वाढीव वीजबिलाचा रिफंड करण्यात यावा ही विनंती.

तसेच वारंवार मीटर बिघाड होण्यामागील कारण शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी.

वरील तक्रार मी 4 फेब्रुवारीं 2025 रोजी देखील www.consumercomplaints.in वर दाखल केली होती. ती खालील link वर दिसतही होती. परंतु, काही तासांमध्येच ती वेबसाईट वरून काढून टाकण्यात आली तसेच माझ्या अकाउंट मधूनही अशी कोणती तक्रार दाखल केल्याचे details दिसेनासे झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे, मी पुन्हा हीच तक्रार दाखल करत आहे.

https://www.consumercomplaints.in/mahadiscom-mseb-msedcl-high-electricity-bill-d...
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
 
Add a Comment

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Mahadiscom / MSEB / MSEDCL
    customer care contacts
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    12%
    Complaints
    4153
    Pending
    0
    Resolved
    507
    Mahadiscom / MSEB / MSEDCL Phone
    +91 22 2261 9100
    +91 22 2261 9300
    Mahadiscom / MSEB / MSEDCL Address
    Hongkong Bank Building, M.G. Road, Fort, Mumbai, Maharashtra, India - 400001
    View all Mahadiscom / MSEB / MSEDCL contact information