Address: | Krishana Chowk,New Sangavi,PUNE-411027 |
तक्रार अर्ज
दिनांक 29 सप्टेंबर 2022
प्रति,
माननीय पोलीस आयुक्त,
पिंपरी चिंचवड, पुणे
विषय :स्टार बाजार, कृष्णा चौक, नवी सांगवी, पुणे 411027 यांच्याविरुद्ध
तक्रार दाखल करण्याबाबत ……
अर्जदार :श्री शिवाजी उत्तरेश्वर तळेकर, शिवनेरी, गल्ली क्रमांक 2, कृष्णा
नगर, नवी सांगवी, पुणे 411027
आदरणीय महोदय,
मी नवी सांगवी येथील रहिवासी असून दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी कृष्णा चौक, नवी सांगवी, पुणे येथील स्टार बाजार मध्ये किराणा सामान व फळभाज्या खरेदी करण्यासाठी मी सायंकाळी 8.00 च्या दरम्यान सामान खरेदी करण्यासाठी गेलो होतो. मी माझी गाडी ही स्टार बाजार समोरील जागेत उभी केली होती .सदरची दुचाकी ही त्या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षारक्षकाच्या समोर उभी केली होती. त्या ठिकाणी इतरही पार्किंगमध्ये गाड्या होत्या किंवा याठिकाणी गाड्या लावू नये असा दर्शनी भागावर कोणताही फलक स्टार बाजार यांनी लावलेला नव्हता.
Dear SBI User, your A/c X7894-debited by Rs5383.0 on 28Sep22 transfers to STAR BAZAAR Ref No[protected]. If not done by u, fwd this SMS to [protected]/Call [protected] or [protected] to block UPI –SBI
किराणा मालाची खरेदी केल्यानंतर खरेदीचे बिल दिल्यानंतर साधारणपणे सायंकाळी 8.30 वाजता किराणामाल घेऊन आणि स्टार बाजार च्या बाहेर आल्यानंतर सदर ठिकाणी माझी दुचाकी वाहन निदर्शनास आले नाही. त्यामुळे मी संबंधित सुरक्षारक्षकाला विचारले असता त्यांनी सांगितले की आपले वाहन वाहतूक पोलिसांनी उचलून नेले आहे. त्यावेळी मी त्यांना विचारले की आपण मला त्या ठिकाणी वाहन लावण्यासाठी सांगितले नाही .ज्यावेळेस आम्ही खरेदी करण्यासाठी स्टार बाजार मध्ये जात होतो त्या वेळेस आपण समक्ष त्या ठिकाणी होता. आपण सांगणे उचित होते की सदरच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही .
आपण दुसऱ्या ठिकाणी वाहन लावा परंतु त्यांनी याबाबत कोणतीही आम्हाला सूचना केली नाही किंवा आम्ही ज्या ठिकाणी गाडी लावली होती ती गाडी रोड सोडून स्टार बाजार च्या समोर लावली होती.
स्टार बाजार मध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहक हे किराणामाल खरेदी करण्यासाठी येत असतात त्यामुळे त्या ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होते .परंतु स्टार बाजारच्या व्यवस्थापनाने सदरच्या वाहनांची कुठलीही व्यवस्था न करता मनमानी पद्धतीने ग्राहकांची लूट करतात व त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देत नाही ही वस्तुस्थिती आहे.यास्तव आम्ही संबंधित स्टार बाजार मधील कर्मचाऱ्याला याबाबत विचारणा केली असता आमचे या ठिकाणी पार्किंग नाही असे त्यांनी सांगून अरेरावीची भाषा वापरली, जी संयुक्तिक नाही व ग्राहकाच्या दृष्टीने अव्यवहार्य आहे.
स्टार बाजार हा व्यवसाय करत असून व्यवसाय करत असून त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या आवश्यक सोयीसुविधा ह्या ग्राहकांना निर्माण करून देणे हे गरजेचे आहे .परंतु स्टार बाजार याबाबत ग्राहकांच्या वाहनासाठी कोणतीही सुविधा न करता वाहतुकीच्या रस्त्याला अडथळा निर्माण करतील अशी कृती करत आहेत. त्यामुळे संबंधित स्टार बाजाराच्या व्यवस्थापनावर पोलिस प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे .
वाहतूक पोलीस प्रशासन ही त्यांची जबाबदारी पार पाडत असून सायंकाळी च्या दरम्यान कृष्णा चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे .त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर मानसिक ताण तणाव निर्माण होत आहे .यासाठी संबंधित दुकानदारांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे .परंतु मोठ्या प्रमाणावर व अव्यवहार्य असे आहे त्यामुळे स्टार प्रशासनाकडून कृष्णा चौक या ठिकाणी होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीत बद्दल त्यांच्यावर पोलिस प्रशासनाने कठोरात कठोर दंडात्मक कार्यवाही करावी .
आपणास विनंती करीत आहोत सदरचे माझी दुचाकी वाहन पोलीस प्रशासनाने उचलून दिल्यामुळे मी स्टार बाजार मधील खरेदी केलेला किराणामाल त्या ठिकाणी सोडून दिला व त्याचे बिल स्टार बाजारला अदा केलेले आहे. परंतु स्टार बाजार या बाबतीत कोणतीही योग्य ती कार्यवाही केलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. मी खरेदी केल्याच्या मालाचे Rs.5383.00 पैसे हे स्टार बाजार कडे आहेत. सदरचा माल मी घेऊन गेलो नाही .
त्यामुळे स्टार प्रशासनाच्या प्रशासनाविरुद्ध पोलिस प्रशासनाने कठोरात कठोर पावले उचलावीत ही आमची पोलीस प्रशासनास विनंती आहे .पोलीस प्रशासनावर वाहतुकीचा मोठा ताण असून त्यांना यामुळे मोठा मानसिक त्रास होतो हे आम्हा नागरिकांना माहिती अज्ञात आहे. त्यामुळे सर्वांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे .परंतु स्टार बाजार सारख्या नाठाळ व्यावसायिकांवर प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करावी ही प्रशासनास आमची नम्र विनंती आहे.
कळावे,
आपला विश्वासू,
शिवाजी उत्तरेश्वर तळेकर
Was this information helpful?
Post your Comment