नमस्कार सर,
माझा जुन्या कर्जाचा शेवटचा हप्ता दिनांक 08.01.2017 रोजी भरला गेला असून त्यावेळी मुद्दल रुपये 1, 57, 703 इतकी होती. आपण मला कर्ज घेण्यापुर्वी टॉपअप साठी कोणतेही चार्जेस लागणार नसलयाचे सांगितेलेले होते. त्यामुळे मला रुपये 3, 00, 000 वजा जाता रुपये 1, 42, 297 इतकी रक्कम मिळणे अपेक्षित होते. आपणाकडून तरी देखिल निरनिराळे चार्जेस लावण्यात आलेले आहेत. व मला प्रत्यक्ष रुपये 1, 32, 979 इतकीच रक्कम चेकद्वारे देण्यात आली आहे. तदनंतरही आपण सांगितल्याप्रमाणे नवीन उर्वरित रक्कमेवरच 1 % प्रोसेसिंग फी आकारली जाईल असे सांगण्यात आले असतानाही संपुर्ण रु 3, 00, 000 रक्कमेवर 1 % प्रमाणे चार्जेस घेण्यात येवून माझेकडून रु. 1577 इतकी जादाची रक्कम घेण्यात आली आहे. तसेच रुपये 922 BPI घेण्यात आलेला असतानाही त्यापुर्वी रु.1612 इतकी BPI चार्जेसच्या नावाखाली रक्कम घेण्यात आली आहे. यामध्ये माझी एक प्रकारे फसवणूक झालेली आहे. तरी आपल्या कार्यालयात आपण व आपल्याकडील कर्ज वितरण अधिकारी यांचेशी प्रत्यक्ष झालेल्या चर्चेनुसार मला उर्वरित माझेकडून जादा घेण्यात आलेली रक्कम रुपये रु. 3189 मला देण्यात यावी. अन्यथा मी पुढील महिन्याचा दिनांक 08.04.2017 रोजी असलेला हप्ता भरणार नाही. याबाबत आपली शाखा जबाबदार असेल याची गांर्भीयपुर्वक नोंद घ्यावी.
HDB Financial Services customer support has been notified about the posted complaint.