ION Broadband — about negligence in refund of router deposit.

Address:Mumbai City, Maharashtra
Website:customer.i-on.in

मी एक I-on Internet चा ग्राहक आहे. मी आपल्याकडील internet ची सुविधा 05.03.2017 रोजी सुरू केली. माझे घर Airoli, sector20 मध्ये आहे. मी internet चा वापर करण्यासाठी सुविधा चालू करतांना एक router Rs.1000/- जमा करून rent basis वर घेतले होते. router घेताना Rs.30/- प्रमाणे दर प्रत्येक महिन्याला आकारले जातील असे मला सदरील ऑफिस मधील एका अक्षय नामे असलेल्या कर्मचाऱ्याने सांगितले होते. त्यांच्याकडूनच मी ही सुविधा चालू करून घेतली होती. मी फेब्रुवारी 2018 रोजी इंटरनेट ची सुविधा बंद केली अन router सुद्धा त्याच वेळी वापस केले. router घेतांना जमा केलेल्या रकमेतील उर्वरित रक्कम cheque द्वारे येतील व सदरचा cheque घेण्यासाठी एक महिन्यांनंतर कार्यालयाला भेट द्या असे मला सांगितले. ज्यावेळी cheque कार्यालयात आले तेव्हा ते महिना Rs.50/- प्रमाणे जमा केलेल्या Rs.1000/- मधून router चा वापर झालेल्या 12 महिन्याचे Rs.600/- वजा करून Rs.400/- चा cheque कार्यालयात आलेला दिसून आला. परंतु Rs.30/- प्रमाणे महिना कपात होईल असा ठराव होऊनसुद्धा मला Rs.50/- प्रमाणे कपात होऊन cheque आला आहे आई मी अक्षय यांच्या निदर्शनास आणून दिले त्यावेळी त्यांनी ते मान्य करून Rs.30/- प्रमाणे मला cheque मिळवून दिला जाईल असे आश्वासन दिले. माझा नेहमीच अनुभव आहे की, जर आम्ही एखादी complaint launch केली तर या service centre किंवा कार्यालयाचे काम आहे की त्या आलेल्या complaint ला solve करणे. परंतु इथे तसे बिलकुल होत नाही. आम्ही प्रत्यक्ष भेट दिल्यानंतरच त्या complaint कडे लक्ष दिले जाते. त्याचप्रमाणे मी ज्या ज्या वेळी कार्यालयाला भेट दिली त्या त्या वेळी माझ्या निदर्शनास आले की त्यांनी माझी ही case समोर forward केलीच नव्हती. शेवटी मी त्यांच्या मागे लागून कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन माझी case समोर forward करवून घेतली. अन त्यांनतर कित्येकवेळा त्यांच्या कार्यालयाला भेट दिली परंतु अजून cheque आलाच नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात येत होते. तब्बल दीड महिन्यांनंतर माला असे सांगण्यात आले की Rs.50/- प्रमाणेच cheque मला मिळेल ठराव झाल्याप्रमाणे Rs.30/- प्रमाणे cheque कंपनी कडून दिला जाणार नाही त्यामुळे आधी हो Rs.50/- प्रमाणे चा जो cheque आला आहे तो मी स्वीकारावा असे मला सांगण्यात आले त्यानुसार मला नाईलाजाने तो cheque स्वीकारावा लागला कारण, एक cheque साठी मला प्रत्येक वेळेस कार्यालयाला भेट देणे शक्य नव्हते कारण कार्यालयाला प्रत्यक्ष भेट दिल्याशिवाय काम होत नाही असे मला माहित होते व मी न्यायालयीन कर्मचारी असून माझी बदली होण्याच्या मार्गावर आहे म्हणून मी तो cheque स्वीकारला. परंतु जेव्हा मी तो cheque बँकेमध्ये जमा करण्यासाठी गेलो तेव्हा बँकेतील कर्मचाऱ्यांनी तो cheque स्वीकारला नाही कारण त्यावरचे माझे नावावरची शाई (print) उडालेली दिसून आली. याबाबत मी अक्षय यांच्याशी cheque स्वीकारताना बोललो होतो परंतु बँक cheque स्वीकारेल असे त्यांनी बोलले परंतु बँकेने cheque न स्वीकारल्याने अक्षय यांच्याकडे मी तो cheque परत जमा केला व त्यांनी मला नवीन cheque मागवून देतो असे सांगितले. परंतु नेहमीच्या मला आलेल्या अनुभवामुळे मी काही दिवसांनी कार्यालयाला भेट दिली त्यावेळी अक्षय गावी गेले आहेत व माझ्या cheque बद्दल मला काहीही सांगितले नाही असे कार्यालयातील एक कर्मचारी विशाल यांनी मला सांगितले व ते 4 दिवसांनी येतील असे सांगितले. परंतु त्यांनतर अक्षय हे गावी निघून गेले व जवळपास 15 दिवस हजर झाले नाही अन त्यांनी त्यांच्या गैरहजेरीत विशाल यांना सुद्धा माझा cheque बदली करून मागवायचा आहे असे सांगितले नाही. विशाल यांना माझ्या cheque बद्दल माहिती असून सुद्धा त्यांनी अक्षय यांना contact करून माझ्या cheque बद्दल विचारणा करून तो cheque बदली करून दिला नाही. त्यांनी सुद्धा माझ्या कामाकडे दुर्लक्ष केले. माझा cheque समोर forward केली की नाही याबाबत विशाल यांना विचारले असता त्यांनी मला माहिती नाही असे उत्तर देऊन उडवून लावले. आज जवळपास फेब्रुवारी 2018 पासून आज पर्यंत म्हणजे तब्बल 5 महिन्यापासून केवळ एका Rs.400/- च्या cheque साठी माझी अश्या प्रकारची छळवणूक आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. आपल्या कार्यालयाकडून माझी केवळ harrasement होत आहे. वेळेवर कोणतेही काम आपल्या कार्यालयाकडून कधीच केले जात नाही. कार्यालयाला प्रत्यक्ष भेट दिल्याशिवाय कोणतेही काम पूर्ण केले जात नाही. नवीन cheque मागवण्यासाठी जुना cheque पाठवला की नाही असे विचारले असता अजून नाही पाठवला असेच वारंवार उत्तर अक्षय हे देत आहेत. अशी माझी ही ऐरोली Sector-20 मध्ये असलेल्या service center अन तिथल्या असलेल्या कर्मचाऱ्याविरुद्धची Complaint आहे. कृपया माझी समस्या लवकरात लवकर Solve करून मला नवीन cheque Rs.50/- ठरलेल्या ठरावाप्रमाणे मला मिळवून देण्यात यावा ही विनंती. माझी यापूर्वी ची complaint id "TKT843136" आपल्या महितीस्तव सादर करीत आहे.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    I-ON
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    31%
    Complaints
    283
    Pending
    29
    Resolved
    77
    I-ON Phone
    +91 22 6292 5555
    +91 80 45114500 [D-Vois Communications]
    I-ON Address
    KHR House,11/1 Palace Road, Bengaluru, Karnataka, India - 560052
    View all I-ON contact information