Address: | Ahmednagar, Maharashtra, 423109 |
आदरणीय महोदय,
उपरोक्त विषयास अनुसरून आपणास विनंती करतो की, माझा आधार क्रमांक[protected] हा मी माझ्या शिर्डी येथील सेंट्रल बँक खात्यात लिंक केला आहे तसेच माझा गॅस ग्राहक क्रमांक 616087 श्री साई गणेश गॅस ऐजन्सी, शिर्डी येथे ही लिंक केला आहे. परंतु माझी गॅस अनुदान माझे बँक खात्यावर जमा होत नाही .याबाबत मी HP गॅस agency कडून व बँक खात्याकडून npci ला ई-मेल पाठविण्यास सांगितले होते कारण माझे आधार npci कडून लिंक केलेले दिसत नाही .मी स्वतः देखील npci ला याबाबत विनंती केली आहे परंतु याबाबत कुठलाही खुलासा होत नाही .
तसेच आपल्या कस्टमर केर नंबर [protected]ला फोन करून याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ते फक्त सांगतात की तुम्ही बँकेत जा तेथे तक्रार करा मी आतापर्यंत किमान 10 वेळेस बँकेत जाऊन आलो आहे . व पुन्हा कस्टमर केर नंबर ला फोन केला तर आपले लोक साधी माहिती देण्याऐवजी फोन कट करतात .
तरी मा.महोदय मी एक सामान्य माणूस आहे मला माझे अनुदान बँकेत प्राप्त करण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती मिळावी व आपला ई-मेल id मिळावा ही नम्र विनंती .
Was this information helpful? |
Post your Comment