| Address: भेकराईनगर, हडपसर, पुणे |
घटना घडल्याची दिनांक: २३ ऑगस्ट, २०२१
वेळ: ११.१५ ते ११.४५
ठिकाण: बी टी कवडे रोडचा ब्रँड फॅक्टरी शोरुम जवळील सिग्नल
गाडीचा नंबर: MH 12 MX 3556
गाडी कोणाच्या नावावर: प्रसाद सरकाळे
गाडी चालवणारी व्यक्ती:पूनम सरकाळे (तक्रारदार) मो.क्र. ९९६०१०६०२१
मी पूनम सरकाळे,
१) सिग्नल तोडला नसतानाही मला अडवून सिग्नल तोडले बाबत (दिनांक: २३ ऑगस्ट, २०२१ वेळ: ११.१५ ते ११.४५)२०० रू दंड वसूल केला. सदर ट्राफिक पोलिस (फोटो सोबत जोडला आहे) माझ्याशी अर्वाच्य भाषेत बोलत होते.
२) त्याचवेळी माझ्या गाडीवर अजुन हेल्मेट परिधान न केल्याबद्द्लचा दि. २ जुलै, २०२० वेळ: १५.१२ वाजताचा ५०० रू दंड प्रलंबित आहे, असे मला सांगण्यात आले. सदर घटनेचा फोटो पाहिला असता फोटोमधील गाडी माझी नाही (फोटो सोबत जोडला आहे). गाडीचा रंग वेगळा आहे. फोटोतील गाडीचा नंबर MH 12 MY 5556 हा आहे. गाडी चालवणारी व्यक्ती अनोळखी आहे. माझी गाडी खरेदी केल्यापासुन गाडीवर नंबर प्लेटच्या वर गणपतीचे छोटे चित्र आहे आणि माझ्या गाडीवर साईराज हे नाव समोर छापलेले आहे. परंतु फोटोतील गाडीवर कोणतेही स्टीकर नाही.
३) अशा प्रकारे माझ्याकडुन एकुण ७०० रू दंड ट्राफिक पोलिसांनी वसुल केला. त्यांनी मला दंडाची पावती दिली नाही. ऑनलाईन पावती भेटेल असे सांगीतले. परंतु अद्याप एसएमएस देखील आला नाही.
माझी अशी विनंती आहे की माझ्या तक्रारीची शहानीशा करून माझ्याकडुन विनाकारण वसुल केलेला एकुण ७०० रू दंड ट्राफिक पोलीस, पुणे यांच्याकडुन परत मिळावा.
धन्यवाद!
Pune Traffic Police customer support has been notified about the posted complaint.