| Address: SAI BABA NAGAR, KATEMANIVALI KALYAN EAST |
| Website: www.kdmc.gov.in |
मौजे काटेमानिवली कल्याण येथील 'ड' प्रभाग क्षेत्र, वार्ड क्रमांक १०३ क्षेत्राच्या हद्दीतील सर्वे नं. ३६ मध्ये आरक्षण क्रमांक ४१९ येथे शाळेचे आरक्षण असून त्या ठिकाणी चाळीचे अनधिकृत बांधकाम भू-माफिया गणेश सुरेश पावशे व इतर यांच्या कडून करण्यात येत आहे, सदर अनधिकृत बांधकामा बाबत "ड" प्रभाग क्षेत्र अधिकारी, मा. आयुक्त साहेब, डॉ. विजय सूर्यवंशी भा प्र से, आयुक्त तथा प्रशासक, उप आयुक्त साहेब, सुधाकर जगताप यांना अनेक लेखी तक्रारी करून सुद्धा सदर प्रकरणाची दखल घेण्यात आली नाही, कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई करताना दिसत नाही. एकीकडे महानगर पालिका यांच्याकडून आमच्या विभागातील आरक्षित मयूर सोसायटी ला आरक्षित भूखंड मोकळे करण्यासाठी नोटीस बजावत आहे व आरक्षित भूखंड मोकळे करण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे "ड" प्रभाग क्षेत्रातील अधिकारी आणि भूमाफिया यांच्या संगनमताने राजरोसपणे शाळेच्या आरक्षित जागेवर नवीन चाळीचे अनधिकृत बांधकाम सुरु आहे, तरी आपण या विषयात गांभीर्याने लक्ष घालून सदर अनधिकृत बांधकामावर योग्य ती कारवाई करून सदर बांधकाम जमीनदोस्त करावे
KDMC customer support has been notified about the posted complaint.