| Address: मा. मुख्य नियत्रंक अधिकारी, २ रा माळा, रायगड भवन, सिडको, बेलापुर, नवी मुंबई ४००६१४ |
महोदय,
मी श्री . भानुदास जयराम भोईर कोपरीगांव, सेक्टर -२६/ ए, वाशी, नवी मुंबई, ठिकाणी राहत असून प्रकल्प ग्रस्थ स्थानिक रहिवाशी आहे. आमचे घर सन १९८२ साली सिडकोचा पूर्ण परवाना घेऊन घर बाधले आहे. घर नं.१६९३ माझ्या घरासमोरील सिडकोने संपादीत केलेली मिठागरची मोकळी जमीन आहे. सिडको संपादीत केलेल्या साडेबारा टक्केचा जमीनीवर अज्ञात लोकांनी अनाधिकृत बांधकामे केले आहे. अशा प्रकारची पूष्कळ अनाधिकृत बांधकामे आजूबाजूला झाले आहे. तसेच उरलेल्या आमच्या येण्या जाण्याच्या जागेत झोपडपट्टी माफियाना अतिक्रमण करायचे आहे. पण सिडकोने राखीव जागेचा फळक लावला आहे. पण काही समाज कंठकाकडून फळक मोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत, वादळी वाऱ्यामुळे फळक मोडून पडला, अज्ञात व्यक्तीकडून फळक लमपास करण्यात आला आहे.जेणेकरून त्या जागेत अतिक्रमण करता येईल. मी विनंती करतो फळक नवीन लावण्यात यावे व मजबूत फौंडेशन करावा, अतिक्रमण करणारांशी आमचा वादविवाद व घातपात होणार नाही.जेणेकरून आमच्या येण्या जाण्याचा रस्ता मोकळा राहील.अशा या अनाधिकृत बांधकामामुळे मला व माझ्या कुटुंबाला त्रास होणार नाही. माझा अर्जाचा सहनभुती पूर्वक विचार करावा. आपल्या विश्वासू श्री. भानुदास भोईर [protected]
City & Industrial Development Corporation [CIDCO] customer support has been notified about the posted complaint.
Thanks in advance for your kind action