Nov 26, 2018
Updated by abhijit chougule दिनांक - 01/10/2018
महावितरण, बिल वितरण विभाग
बाणेर- बालेवाडी-औंध
- विषय - वीज बिल वेळेत न येणे बाबत . गेले अनेक महिने तक्रार करत आहे
(पुण्यातील बाणेर-बालेवाडी-औंध स्मार्ट सिटी मधील परिसरात हि अवस्था आहे)
महोदय -
रेग्यूलस सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, बालेवाडी -४५, आमच्या या सोसायटीत व बाणेर-बालेवाडी परिसरात महावितरण कडून येणारी विजेची बिले हि वेळेत येत नाहीत व आम्हाला दंड भरावा लागत आहे . आमच्या सोसायटी मध्ये १६० सदनिका व मीटर आहेत . सोसायटीचे १४ इतर मीटर आहेत .
सर्वाना येणारी बिले हि पहिली असलेली सूचक तारखेच्या दिवशी किंवा एक दिवस आधी मिळत आहेत. गेली एक वर्ष भर हा त्रास होत आहे . अनेक वेळा तोंडी किंवा फोन करून तक्रार निवारण विभागाकडे तक्रार केली आहे . तरी पण कोणताही प्रतिसाद मिळाला गेला नाही. आम्ही वेळेवर बिल येत नसल्यामुळे आम्हाला सवलत माफ करावी किंवा दंड आकारण्यात जावु नये, नाहीतर वेळेत बिल मिळावेत हि विनंती.
- मागील तंत्रात केलेली दिनांक २०/०६/२०१७ व इन वार्ड नंबर - २३१७
- मागील तंत्रात केलेली दिनांक २७/०९/२०१७ व इन वार्ड नंबर - ६४०४
- मागील तंत्रात केलेली दिनांक २३/०८/२०१७ व इन वार्ड नंबर - ५१७०
- प्रत्येक वेळेला तक्रार केली आहे. तरीही आम्हाला लाईट बिले येत नाहीत .
- अनेक वेळा तक्रारी करून हि कोणतेही प्रतिसाद मिळत नाही.
- पुण्यातील बाणेर-बालेवाडी-औंध स्मार्ट सिटी मधील हि अवस्था आहे
कळावे आपला विश्वस्त
अभिजीत चौगुले ८४८५८४४४८८
व्यवस्थापक
रेग्यूलस सहकारी गृहरचना संस्था मर्यादित,
बालेवाडी -४५