महोदय,
आपण नेहमी लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. आपला एखाद्या सुचवलेल्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असल्याने, आपल्यापुढे विद्यार्थ्यांसंबंधी एक सुचना नम्रपणे मांडत आहे. बापु ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी विविध ठिकाणच्या शाळा, महाविद्यालयात एस.टी.ने जाऊन शिकत आहेत. एस.टी.पास घेण्यासाठी विद्यार्थ्याला तास बुडवून, शाळेला दांडी मारून पास घ्यावा लागत आहे. पास काढण्यासाठी पास व्यतिरिक्त पैसे खर्चुन यावे लागत आहे. उदा. बापु तुमच्या मतदार संघातील मुलगा शिक्षणासाठी पानवडी, मांडकीवरुन परिंचेला शिकायला एस.टी.ने येत असेल तर त्याचा पास संपल्यावर, त्याला पास काढण्यासाठी शाळा बुडवून सासवडला यावे लागते. त्यामुळे त्याचे प्रत्येक महिन्यातील एक दिवसाचे शिक्षण, वेळ, पैसा वाया जात आहे. महाराष्ट्रातील अशा अनेक विद्यार्थ्यांबाबत हे वर्षानुवर्ष घडत आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचा शिक्षण, वेळ, पैसा वाया जात आहे, त्याचे आर्थिक गणित मांडले तर आकडा मोठा निघेल.
बापु मी फक्त प्रश्न उपस्थित करीत नाही तर, त्याला पर्यायही सुचवत आहे.ते पुढीलप्रमाणे
१) सध्या प्रत्येक एस.टी.मध्ये डिजीटल मशीनच्या सहाय्याने तिकीट दिले जाते, त्याच मशिनद्वारे पासही देता येऊ शकतो. उदा.पी.मी.टी.ने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्याला, प्रवाशाला एक दिवसाचा तसेच मासिक पास बसच्या कंडक्टरकडेच मिळतो. तशीच सुविधा एस.टी मध्ये उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना पाससाठी तास किंवा शाळा बुडवावी लागणार नाही, वेळेची बचत होईल.
२) पास काढण्यासाठी प्रत्येक महिन्याला पास व्यतिरिक्त पैसे खर्चुन यावे लागणार नाही, पैशाची बचत होईल. फक्त वर्षातुन एकदाच विद्यार्थ्याला विद्यार्थ्यी ओळखपत्र काढण्यासाठी पास केंद्रावर यावे लागेल.
३)पास जर एस.टी.त उपलब्ध झाल्यास, पास केंद्रावर येणारा ताण कमी होईल.
ही कल्पना जरी प्रथमदर्शनी छोटी वाटत असली, तरी ती विद्यार्थ्यांसाठी फायद्याची आहे. आपण आपल्या पक्षाचे परिवहनमंत्री मा.दिवाकर रावते यांच्यापुढे ही संकल्पना मांडुन ती अमलात आणण्यास नक्कीच पुढाकार घेताल याची मला खात्री आहे.विद्यार्थ्यांचे चांगले आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असतील.
- अमोल जगताप,
इको फाऊंडेशन, सासवड
Msrtc toll free no or customer care mail id didn't reply why started the unused services to do the harassment of people.
Please provide the solution early as possible.