Jul 28, 2019
Updated by Prasad Punjekar माननीय मंत्री तथा प्रशासन,
माझे गाव चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदुर
जेथे मोठे उद्योग, वसाहती, शैक्षणिक संस्था, कोलमाईन्स
लोकसंख्या ही 50, 000 च्या घरात (नगरपरिषद) आंध्र सीमालगत असलेलं शहर
इतके सर्व असून ही आज पर्यंत बस स्थानक नाही साधे बस ये जा करतात त्यासाठी शेड सुद्धा नाही
विद्यार्थ्यांना भर उन्हात, पावसात उभे राहावे लागत आहे
प्रवासी संख्या इतकी मोठी की अपुऱ्या बसेस, नित्कृष्ठ दर्जा, व वेळापत्रक ही नाही.. असो..
परंतु इतके सगळे असताना व जे आधीपासून च बसस्थानक आहे असे चंद्रपुर, बल्लारपूर, व आता राजुरा या ठिकाणी नूतनीकरण व काय काय शासनाचे सोंग चालू आहे व आमच्या गावात अजून एकही बसस्थानकासाठी न उचललेले पाऊल हे आपले
अकार्यक्षमत दर्शवते
आमदार साहेब नाकावरची माशी हाकलत नाही ते काय बसस्थानकासाठी लढतील कारण सत्ताधाऱ्यांच्या आई बहिणी इथून प्रवास करीत नाहीत ना..!!!
त्यांच्या आई बहिणी ना या यातना सहन करा लागल्या असत्या तर समजले असते
उपकार नाही मागतोय आम्ही आमच्या टॅक्स चा मोबदला कामा स्वरूपात मागत आहो..