मी पुसद, जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी असुन पुसद बस स्थानकात वाहन पार्किंगची सुविधा आहे. दोन चाकि वाहनास दिवसा रु 10/- व रात्री चे रू 30/- आकारले जातात.
मी नेहमी बसनेच प्रवास करतो आणी मोटर सायकल या वाहनतळावर ठेवतो.
या वाहन तळास msrtc, pusad कडुन अधिकृत ठेका देण्यात आला किंवा नाही याबाबत माहीती नाही परंतु नियमा नुसार ठेका दिल्यास दर्शनी भागावर ठेळ्याची प्रत लावलेला नाही तसेच ठेक्यानुसार ठरलेले वाहनांचे भाडयाचे फलक लावलेले नाही, भाड्याची पावती दिली जात नाही. आणी मनमानी पध्दतीने प्रवाशांकडुन रक्कम वसुली केली जात आहे.
मी दि.[protected] रोजी मी अमरावती जाण्यासाठी माझी मोटर सायकल बस स्थानकातील वाहनतळामध्ये ठेवली व मला दि.[protected] रोजी सायंकाळी परत यावयाचे होते. त्यासाठी मला रू. 30/- भाडे सांगीतले परंतु दुसरे दिवशी परत आल्यावर रु. 50/- भाडे घेण्यात आले. त्याची पावती मागुन सुध्दा देण्यात आली नाही. अशा पध्दतीने वाहनतळ धारकाकडुन सामान्य प्रवाशांची आर्थीक लुट केली जात आहे.
आपलया विभागाकडुन वाहनतळासाठी ठेका देण्यात आला आहे काय? वाहनांसाठी किती रुपये भाडे दिवसा व रात्री करिता ठराविण्यात आले? त्या भाज्याची पावती देण्याची व्यवस्था आहे काय? दराचे फलक ची व्यवस्था आहे काय?. माहीती दयावी व ठेका देताना घालुन दिलेल्या आर्टा व शर्ती ची प्रत दयावी
वरिल प्रमाणे प्रवाशांचे आर्थीक पिळवणुकि बाबत त्वरीत योग्य चौकशी करावी व अटी प्रमाणे वाहनतळ धारकास भाडे आकारून पावती देण्यास बाध्य करावे व प्रवाशांची आर्थीक लुट थांबवावी
धन्यवाद
Adv prashant kagdelwar
Session court, pusad, dist. Yavatmal
[protected]