| Address: Thane, Maharashtra, 400601 |
दिनांक 18 नोव्हेंबर 2017 : एक अनुभव एसटी मधील
दुपारच्या 2-30 च्या ठाणे ते बोईसर एसटी साठी आईला घेऊन ठाणे एसटी स्थानक गाठले.
MH-07, C-7260 एसटी लागली होती, बऱ्या पैकी भरली होती पण, एक जागा आईला मिळाली.
मी (वय-५९ वर्षे ) उभा होतो. दुसऱ्या सीट वरील आजी म्हणाल्या जा ड्रायव्हर च्या बाजूच्या सीटवर बसा, पहिल्या सीटवर जिथे वाहक लिहिले होते त्या भरल्या होत्या.
आणि ड्रायव्हरच्या बाजुच्या सीटवर एक सतरंजी होती, त्यामुळे मी तेथे जाण्यास तयार नव्हतो.
परत 4 नं सीट वर बसलेल्या आजी म्हणाल्या, भाऊ बसा त्या जागेवर तेथे कोणी आधी बसलेले नाही, विचार केला ठीक आहे कोणी आले तर उठू.
2-15 वाजता वाहक (conductor) आले आणि म्हणाले इथून उठा.
मी म्हणालो - मागे जागा नाही. ते म्हणतात - मी काय करू त्याला, मी इथे सतरंजी ठेवली आहे.
मी : मागे वाहक लिहिले आहे तिथे तुम्ही बसा, तुम्ही स्टाफ आहात, तुम्ही कशी अशी जागा अडवू शकता, नियमानुसार कोणीच अशी जागा अडवू शकत नाही.
किंवा मी उठतो तुम्ही मला वाहक लिहिल्या जागी बसवा, जागा दिल्या शिवाय मी उठणार नाही.
मध्येच अचानक चालक (Driver) बोलू लागले : तुम्ही काय एसटीचे बाप आहात काय, गुमान उठा !
मी : तुम्ही एसटीचे बाप आहात काय ? मला मागे जागा ध्या मी तेथे बसतो.
वाहक : ( माझा हात पकडून, एकेरीवर आले ) खाली उत्तर, जास्त बोलायचे काम नाही,
तेवढ्यात माझी आई रडत उभी राहिली, म्हणते आपण खाली उतरू. पुढील एसटीने जाऊ, कीवा रद्द करू.
मी: (इतर प्रवाशांना उद्धेशून )
पहा चालक साहेब म्हणतात आम्ही एसटीचे बाप आहोत .
चालक : हो आम्ही एसटीचे बाप आहोत.
आई उठून पुढे येऊ लागली, तसा मी उठलो.
तो पर्यंत वाहकाच्या जागेवर बसलेली स्त्री उठली व खाली उतरली.
मागाचची आजी म्हणाल्या : जागा खाली झाली बसा, जाऊद्या !
Nov 19, 2017
Updated by nchiv Phone No:- [protected]
I am regular customer of msrtc . Kolhapur to Pune and Pune to Kolhapur I observed that always late shivshahi @morning 5.00 o clock buses by 15- 20 min and bus always dusty so I request to you please clean the bus regularly and timely